‘सोमेश्‍वर’चे नेतृत्व वर्गमित्रांच्या हाती

सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलने विक्रमी यश प्राप्त केले होते
someshwar sugar mill
someshwar sugar millsakal media
Updated on

सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप यांची सलग तिसऱ्यांदा निवड झाली. त्यांचेच महाविद्यालयातील वर्गमित्र असलेल्या आनंदकुमार होळकर यांना उपाध्यपदाची संधी मिळाली आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तीस वर्षांच्या सत्ताकाळात तिसऱ्यांदा अध्यक्षपद मिळविणारे ते एकमेव ठरले आहेत.

someshwar sugar mill
एसटी संपाचा दुसरा दिवस; तर महामंडळ हायकोर्टात दाखल करणार याचिका

सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलने विक्रमी यश प्राप्त केले होते. यानंतर पदाधिकारी निवडीचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच होते. त्यानुसार त्यांच्यावतीने सोमवारी (ता. ८) सकाळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी या दोन्ही नावांची घोषणा केली. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडप्रक्रिया सुरू झाली तेव्हा जगताप व होळकर यांचे अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठीचे एकेक अर्ज दाखल झाले. त्यामुळे सोपस्करानंतर साडेबारा वाजता अधिकृत निवडीची घोषणा झाली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद टांकसाळे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी निवडप्रक्रियेत सहकार्य केले. निवडीनंतर संभाजी होळकर, पुरुषोत्तम जगताप, आनंदकुमार होळकर यांची मनोगते झाली.

याप्रसंगी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, संदीप जगताप, सुनील भोसले, पोपटराव भोसले, बापूराव धापटे, राजेंद्र जगताप, कौस्तुभ चव्हाण आदी उपस्थित होते. कै. रामराजे जगताप हे कारखान्याचे संस्थापक संचालक होते. त्यांचे चिरंजीव पुरुषोत्तम जगताप हे राष्ट्रवादीकडून सन १९९२-९७, २००२-०७, २००७-१५, २०१५-२१ व २०२१-२०२६ असे पाच वेळा संचालक झाले आहेत.

someshwar sugar mill
कोरेगाव-भीमा हिंसाचाराची १५ नोव्हेंबरपासून पुन्हा सुनावणी, रश्मी शुक्ला यांना समन्स

मागील पाच वर्षात त्यांच्या अध्यक्षकाळात कारखाना कर्जमुक्त झाला, चांगले भाव देऊन राज्यातील नामांकित कारखान्यांच्या यादीत कारखान्याला बसविले, महत्वकांक्षी विस्तारवाढ सुरू केली. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे पुन्हा पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास टाकला. तर, आनंदकुमार होळकर यांचे वडील शांताराम होळकर यांना जिल्हा बँकेचे संचालकपद भूषविण्याची संधी मिळाली होती. आनंदकुमार हेही सन २००२-२००७ या कार्यकाळात पहिल्यांदा संचालक झाले. आता दुसऱ्यांदा संचालक होऊन उपाध्यक्षपदावरही हक्क प्रस्थापित केला.

"पवार कुटुंबीयांनी व सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास टाकला, याबद्दल त्यांचे आभार. आमचे संचालक मंडळ त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, असे काम करेल. गतिमान काम करून उत्कृष्ट तांत्रिक क्षमता राखत सभासदांना चार पैसे अधिकचे देण्याचा प्रयत्न राहील."

- पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष

"सोमेश्वरसारख्या नामांकित कारखान्याचे उपाध्यक्षपद भूषविणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट अजितदादांमुळे प्राप्त झाली. सभासद, कामगार, वाहतूकदार, मजूर यांना पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे."

- आनंदकुमार होळकर, उपाध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.