देव तारी त्याला कोण मारी! सोनाई संचालक किशोर माने यांना पाण्यातून काढले सुखरुप बाहेर

a man stuck in a tree for 6 hours after being swept away by the flood in nirvangi
a man stuck in a tree for 6 hours after being swept away by the flood in nirvangi
Updated on

वालचंदनगर : कळस (ता.इंदापूर) येथील ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्याबरोबर चारचाकी सहित वाहून चालले सोनाई डेअरीचे संचालक व उद्योजक किशोर माने यांना ग्रामस्थांना व पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्हामध्ये बुधवार (ता.१४) रोजी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे कळस गावातील ओढ्याला पूर आला होता. सायंकाळी सातच्या सुमारास किशोर माने हे चालक सह कळस गावातून रुई गावातील घराकडे चारचाकी गाडीमधून चालले होते. अचानक ओढ्यातील पाणी वाढल्याने माने यांची गाडी ओढ्याच्या पाण्यामध्ये वाहू लागली. माने गाडीतून बाहेर पडून एका ओढ्यातील झाडाला धरुन ठेवले होते.

Pune Rain:पुण्यात आज काय घडतंय? परीक्षा पुढे ढकलल्या, महापालिकेची हेल्पलाईन सुरू

तब्बल 6 तासांनी ग्रामस्थांनी व पोलिसांनी माने यांना दोरीच्या साहय्याने पाण्याच्या सुखरुप बाहेर काढले. ओढ्याच्या पाण्यामध्ये वाहून जात असताना माने यांचा पुर्नजन्म झाला असून देव तारी त्याला कोण मारी अशी म्हणयाची वेळ आली आहे. किशोर माने हे सोनाई उद्योग समूहाचे संचालक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.