Railway : दक्षिण भारतात जाणाऱ्या रेल्वे जुलैमध्ये रद्द; सात दिवसांचा ‘पॉवर ब्लॉक’

पुणे विभागातील दौंड रेल्वे स्थानकाच्या यार्डमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’चे काम होणार आहे. हे काम पुढील महिन्यात होणार आहे.
Railway
Railwaysakal
Updated on

पुणे - पुणे विभागातील दौंड रेल्वे स्थानकाच्या यार्डमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’चे काम होणार आहे. हे काम पुढील महिन्यात होणार आहे. त्यासाठी सात दिवसांचा ‘पॉवर ब्लॉक’ घेतला जाणार आहे. त्यामुळे दक्षिण भारतात मुंबईला जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्या रद्द होणार आहेत. यात पुणे-सोलापूर इंटरसिटीचाही समावेश आहे.

दौंड स्थानकावर पुण्याच्या दिशेने असलेल्या यार्डमध्ये ‘मेन लाइन’वर होणाऱ्या कामाची तारीख ठरलेली नाही. जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात काम होणार असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तयार करण्यात आलेल्या विभागीय सूचना परिपत्रकानुसार (डीसीएन) रोज सुमारे २० गाड्या रद्द होतील, तर इतर २० गाड्यांचे मार्ग बदलले जातील. त्यामुळे सोलापूर-पुणे-मुंबई या मार्गावरील सेवेवर परिणाम होईल.

पुणे - सोलापूर-पुणे दरम्यान दुपारच्या वेळी धावणाऱ्या इंटरसिटी सह २० गाड्या ब्लॉकच्या काळात रद्द केल्या जातील. दक्षिण भारतातून येणाऱ्या काही महत्त्वाच्या गाड्याही रद्द केल्या जातील, तर इतर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात येईल. काही गाड्या कुर्डुवाडी, लातूरमार्गे पुण्याला येतील. त्यामुळे या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावतील.

दौंड कॉर्ड लाइनवर परिणाम

दौंड स्थानकावरील यार्डमध्ये काम होणार असले तरी याचा परिणाम दौंडच्या कॉर्ड लाइनवरून जाणाऱ्या गाड्यांवरही होईल. कॉर्ड लाइनवरील रेल्वे सेवा एका दिवसासाठी रद्द केली जाईल. पुणे-मनमाड दरम्यान धावणाऱ्या गाड्यांची संख्या २८ इतकी आहे. या गाड्या सुद्धा एका दिवसासाठी रद्द होतील. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.