कोरोना काळात नागरिकांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम

कोरोना काळात नागरिकांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम
Updated on

पुणे : कोरोनाची एक लाट संपल्यानंतर दुसरी लाट... पुन्हा तिसरी लाटेची शक्यता... सध्या रुग्णालयात बेड्स नाहीत... ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरचा अपुरा साठा... या सर्व बाबींचा अनेकांच्या कौटुंबिक जीवनावर परिणाम होत आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण सुरू आहे. परंतु या संकटाला धैर्याने सामोरे जायचे असेल तर जीवनपद्धती बदलण्यासोबत नागरिकांचे मनोबलही वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासनानेही विशेष मोहीम हाती घेतली आहे.

पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, सध्या कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. परंतु कोरोनाचे संकट कधीपर्यंत सुरू राहील, याची माहिती नाही. त्यामुळे कोरोनासोबतच जगताना प्रत्येकाने स्वत:च्या जीवनपद्धतीत बदल करणे अनिवार्य झाले आहे. यासोबतच नागरिकांचे मनोबल वाढल्याशिवाय ते कोरोनाच्या लाटेचा मुकाबला करू शकणार नाहीत. त्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.

कोरोना काळात नागरिकांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम
सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे जिल्ह्यासाठी वैद्यकीय, महसूल, पोलिस यासह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची समिती गठित करण्यात आली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास (जीएसडीए) यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. या समितीमध्ये आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, डॉ. धनंजय केळकर, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, डॉ. अतुल झिरपे यांच्यासह अन्य तज्ज्ञांचा समावेश आहे. नागरिकांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रबोधनात्मक मार्गदर्शन तसेच योग, ध्यानधारणा शिबिरांचे आयोजन करणे अशा स्वरुपाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

शॉर्ट व्हिडीओच्या माध्यमातून प्रबोधन

कोरोनाच्या संकटापासून दूर राहण्यासाठी आणि नागरिकांचे मनोबल वाढविण्यासाठी शॉर्ट व्हिडिओ तयार करण्यात येणार आहेत. हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांचे प्रबोधन होण्यास मदत होइल, असे विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.