कोरोनानंतर मधुमेहींनी घ्या विशेष काळजी; म्युकरमायकॉसीसचे सर्वाधिक रुग्ण मधुमेही

कोरोनानंतर मधुमेहींनी घ्या विशेष काळजी; म्युकरमायकॉसीसचे सर्वाधिक रुग्ण मधुमेही
Updated on

पुणे : म्युकरमायकॉसीस हा बुरशीजन्य आजार झालेल्यांपैकी तब्बल ९४ टक्के रुग्णांना मधुमेह (डायबेटिस) असल्याचे निरीक्षणातून समोर आले आहे. यासंबंधी ‘जर्नल ऑफ फन्गाय’ या शोधपत्रिकेत एक शोधनिबंध नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे कोरोनातून बऱ्या झालेल्या आणि मधुमेह असलेल्या लोकांनी विशेष काळजी घ्यायला हवी, असे डॉक्टरांच्या वतीने सांगण्यात येत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात म्युकरमायकॉसीसच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनामध्ये अशा रुग्णांची संख्या का वाढली, त्याला कोणते घटक कारणीभूत आहेत आदींचा आढावा घेण्यासाठी अमेरिकेतील डॉ. टेनी जॉन, डॉ. सीना जेकॉब आणि डिमीट्रीयस नॉटॉइयानीस या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले. यामध्ये मार्च महिन्यात भारतातील २९ आणि भारताबाहेरील १२ रुग्णांचा अभ्यास करण्यात आला आहे. चंडीगड येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्चचे शास्रज्ञ डॉ. हरिप्रकाश प्रसाद यांनी म्युकरमायकॉसीसचा कोरोना साथीच्या आधीच एक संशोधन केले होते. त्यानुसार देशात मधुमेह असणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पर्यायाने म्यूकरमायकॉसीसचा धोकाही मोठ्या प्रमाणावर आहे. उत्तर भारतात याचे जास्त रूग्ण आढळतात तसेच, त्यांचे मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. कोरोना साथीच्या काळात आरोग्य व्यवस्था आणि मानवी शरीरही एका अभूतपूर्व आणीबाणीचा सामना करत आहे. अशा वेळी सर्वांनी विशेष काळजी घ्यायला हवी. त्यातल्या त्यात मधुमेह असलेल्या रुग्णांनी तर जास्तच लक्ष द्यायला हवे.

कोरोनानंतर मधुमेहींनी घ्या विशेष काळजी; म्युकरमायकॉसीसचे सर्वाधिक रुग्ण मधुमेही
कोरोना काळात नागरिकांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम

संशोधनाचे निष्कर्ष :

  • - डिसेंबर २०१९ ते एप्रील २०२१ या कालावधीत उत्तरोत्तर म्युकरमायकॉसीसच्या रूग्णांची संख्या वाढली

  • - कोरोनानंतर म्युकरमायकॉसीस होणाऱ्यांमध्ये सर्वाधिक रूग्ण मधुमेहाची

  • - या बुरशीचा प्रामुख्याने तोंड (र्हिनो-ऑर्बायटल) आणि मेंदू (र्हिनो-सेरेब्रल) शी निगडीत संसर्ग जास्त

  • - मधुमेह असलेल्या रूग्णांवर कोरोनाचे उपचार करताना विशेष काळजी घेणे गरजेचे

१) सहव्याधी असलेल्या म्युकरमायकॉसीस रूग्णांचे प्रमाण :

  • सहव्याधी : रूग्णांची संख्या (टक्के)

  • अनियंत्रीत मधुमेह : ९४

  • ग्लॅकेटेड हिमोग्लोबीन : ४.४

  • डायबिटीक केटोएसीडॉसीस : ४४

कोरोनानंतर मधुमेहींनी घ्या विशेष काळजी; म्युकरमायकॉसीसचे सर्वाधिक रुग्ण मधुमेही
सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

२) म्युकरमायकॉसीसच्या रूग्ण संख्येचा प्राथमीक अंदाज :

  • महाराष्ट्रात : १६,८०० रूग्ण

  • भारतात : १,८९,००० रूग्ण

अशी घ्या काळजी :

  • - रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलीत करा, रक्तदाब नियंत्रित करा, रोगप्रतिकारशक्ती वाढेल असा आहार घ्या

  • - कोरोनातून बरे झाल्यानंतरही घरातही मास्क वापराच

  • - कोरोनातून डिस्चार्जपूर्वी तोंडाचा एक्सरे काढा

  • - घरातील बुरशीवाढते अशी ठिकाणे आणि धुळीपासून दूर रहा

  • - डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटी फंगल औषधे घ्या

ज्या रुग्णांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, त्यांना या बुरशीची लागण होत नाही. परंतू, अनियंत्रित मधुमेह, कर्करोग, एडस् असणाऱ्यांना, तसेच स्टिरॉईडस्, सायक्लोस्पोरिन ही प्रतिकारशक्ती कमी करण्यास कारणीभूत ठरणारी औषधे घेणाऱ्यांना हा आजार पटकन लक्ष्य बनवतो.

- डॉ. जे. बी. गार्डे, दंतशल्यचिकित्सक, एम.ए. रंगूनवाला दंत महाविद्यालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.