"मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळण्यात राज्य सरकारला अपयश, स्वतंत्र अधिवेशन बोलवा"; सुप्रिया सुळेंची मागणी

Supriya Sule
Supriya Sule
Updated on

आरक्षणाचा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे. त्या मुद्द्यावर राज्य सरकारने स्वतंत्र खास अधिवेशन बोलविण्याची गरज आहे. त्यात आम्ही ताकदीने मत मांडूच. कारण आम्ही त्याला पाठिंबा देत आहोत, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. राज्य सरकारने मराठा, धनगर, मुस्लिमसह लिंगायत समाजाच्या मागण्यांकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या समाधिस्थळी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

खासदार सुळे म्हणाल्या, ‘‘खासगीतील गोष्टींवर कोणी काहीही बोलेल. त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. मात्र, राज्यातील राजकारणाकडे आपण सर्वांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी जास्त जबाबदारीने बोलले पाहिजे. त्यासाठी सरकारने अत्यंत संवेदनशीलपणे सर्व स्थितीकडे पाहिले पाहिजे. आरक्षण अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. त्याकडे कोणीही गांभीर्याने पाहताना दिसत नाही. मराठा, लिंगायत, धनगर व मुस्लिम समाजाच्या मागण्या काय आहेत. त्यासाठी स्वतंत्र अधिवेशन बोलवावे. त्यात आम्ही ताकदीने चर्चा करू. आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे.’’ (Latest Marathi News)

मराठा आरक्षणाचा प्रश्न व्यवस्थित हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे, असे स्पष्टपणे नमूद करून सुळे म्हणाल्या, ‘‘मराठा, धनगर, लिंगायत व मुस्लिम समाज यांना आरक्षण देऊ किंवा त्यांच्याशी चर्चा करू म्हणत दहा वर्षे झुलवले आहे. त्यामुळे तो पक्ष भ्रष्ट जुमला पार्टी झाला आहे. तो पक्ष जुन्या लोकांनी चालवला. त्यांनी तो भाजप म्हणून राखला. मात्र, आता केवळ भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत.’’

Supriya Sule
मुलगा असूनही मुलींच्या स्टाईलमध्ये बनवायचा रील्स; दोन दिवसांपूर्वी संपवलं जीवन, सत्य आलं समोर

जरांगे- पाटील यांचे पुढचे टार्गेट भाजप असेल काय, या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, ‘‘टार्गेट वगैरे काही नसते. त्या भावना लोकांच्या असतात; पण जे सत्य असते. ते सारे लोकशाहीमध्ये बोलत असतात. एखाद्या नेत्याला जर काही बोलायची इच्छा झाली, तर तो फक्त विरोधात बोलतो, असे नाही. ठिक आहे, एक काळ असतो. त्याची आपण संवदेनशीलपणे उत्तरे द्यायची असतात.’’

अंतरवली सराटीमध्ये गुन्हे दाखल झाले. त्यांच्या घरी बंदूक सापडली. याकडे आपण कसे बघता, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, ‘‘गृह खात्याचे शुद्ध अपयश आहे. त्याची सगळी माहिती ठेवण्याचे गृहखात्याचे काम असते. मात्र, ते होताना दिसत नाही. अनेक वर्षे जे यशस्वी गृहमंत्री राहिले. त्यांचे काम या टर्ममध्ये अत्यंत खराब दिसते आहे. असे काय झाले, त्याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.’’

Supriya Sule
मोठी बातमी! कोचीन विद्यापीठात चेंगराचेंगरीत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.