पुणे : ‘विज्ञान प्रसार’च्या वतीने आयोजित विज्ञान चित्रपट महोत्सवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बाजी मारली आहगे. विद्यापीठातील शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राने (ईएमआरसी) निर्मिलेल्या ‘कमला- द स्वदेसी न्यूट्रीइंडियन’ या माहितीपटाला देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. १३ व १४ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे ऑनलाईन पध्दतीने ही स्पर्धा पार पडली.ईएमआरसीने महिला शास्त्रज्ञ डॉ. कमला सोहोनी यांच्या कार्यावर माहितीपट तयार केला. (Pune News)
डॉ. सोहोनी या विज्ञान विषयात केम्ब्रिज विद्यापीठातून पीएच.डी करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ होत्या. देशातील लोकांना आपल्या संशोधनाचा उपयोग व्हावा या हेतूने त्या भारतात परतल्या होत्या. भारतीय आहारशास्त्रातील पोषक अन्नद्रव्यांवर त्यांनी मूलभूत संशोधन केले आहे. महितीपटाचे दिग्दर्शन 'ईएमआरसी'चे संचालक डॉ.समीर सहस्रबुद्धे यांनी केले आहे. सहाय्यक दिग्दर्शन व संकलन मिलिंद पाटील, संशोधन आणि संहिता अजिता देशमुख यांनी लिहिली आहे. तसेच कॅमेरा अप्पा चिंचवडे, ध्वनी राम जाधव व प्रदीप भोसले, सेट निर्मिती राजेश देशमुख आदींनी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.