SRA Campaign : ‘एसआरए’ची मोहीम; झोपडीधारकांची सोसायटी स्थापणार

झोपडपट्टीचे पुनर्वसन गतीने व्हावे म्हणून झोपडीधारकांनी स्वत:हून पुढे यावे आणि सोसायटी स्थापावी म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) मोहीम हाती घेतली आहे.
Slum
Slumsakal
Updated on

पुणे - झोपडपट्टीचे पुनर्वसन गतीने व्हावे म्हणून झोपडीधारकांनी स्वत:हून पुढे यावे आणि सोसायटी स्थापावी म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील झोपडीधारकांची पात्रता यादी निश्‍चित केली जाईल. त्यानंतर त्यांच्या माध्यमातून सोसायटी स्थापन केली जाईल.

शहरे झोपडपट्टीमुक्त व्हावीत म्हणून राज्य सरकारने ‘एसआरए’ची स्थापना केली, मात्र सरकारच्या धोरणातील सुसंगतीअभावी १७ वर्षांत ६० हून जास्त झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होऊ शकले नाही. सरकारी धोरणामुळे विकसकही पुढे येण्यास तयार होत नाहीत. परिणामी, शहरे झोपटपट्टीमुक्त करण्याचे स्वप्न कागदावरच राहिले आहे.

सध्याच्या पद्धतीनुसार विकसक पुढे आल्यानंतर झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम सुरू होते. आता झोपडीधारकांनीच एक पाऊल पुढे टाकत स्वतःच पुनर्वसनाचा विषय हाती घ्यावा, असे ठरले आहे. त्यासाठी झोपडीधारकांनी एकत्र येऊन सहकारी गृहनिर्माण सोसायटी स्थापन करावी.

झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन जलदगतीने करण्याच्या हेतूने झोपडीधारकांची सहकारी गृहनिर्माण सोसायटी स्थापन करण्यासाठी प्राधिकरणाने पुढाकर घेतला आहे. सोसायटी स्थापन करण्यासाठी पात्र सभासदांची यादी निश्‍चित करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे झोपडीधारकांनी पात्र सभासदांची याद्या निश्‍चित करून घ्यावी.

- नीलेश गटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, एसआरए

Slum
PMP : पुणे महापालिका पीएमपीला देणार २०० कोटी रुपये

अनेक विषय मार्गी लागणार

या सोसायटीच्या माध्यमातून पुनर्वसनासह अनेक विषय मार्गी लावणे शक्‍य व्हावे म्हणून प्राधिकरणाने प्रयत्न सुरू केले आहेत. सोसायटी स्थापन करण्यासाठी प्राधिकरणाने पुढाकर घेतला आहे. प्रत्येक झोपडीपट्टीत सोसायटी स्थापन झाल्यानंतर त्यांची शिखर संस्था म्हणून महासंघ स्थापण्याचे प्राधिकरणाचे नियोजन आहे. त्यामुळे पुनर्वसनापासून झोपडीधारकांचे सर्व प्रकारचे प्रश्‍न महासंघ आणि प्राधिकरण यांच्या समन्वयाने सोडविण्यात येतील.

पुणे शहरात जवळपास ५५० झोपडपट्ट्या आहेत. पात्र झोपडीधारक सदस्यच एकत्र येऊन सोसायटी स्थापन करू शकतात. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पात्र झोपडपट्टीधारकच्या याद्या तयार करण्याचे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.

Slum
Pune Crime : पत्रकारावर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक, चार अल्पवयीन ताब्यात

सोसायटी स्थापन केल्यानंतर फायदे

  • नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण सोसायटी स्थापन झाल्यास सर्वेक्षण, पात्रता निश्‍चितीची प्रक्रिया जलदगतीने होण्यास मदत

  • सोसायटीच्या माध्यमातून पुनर्विकासाकरिता विकसक निवडण्याची सभासदांना संधी

  • सोसायटीच्या माध्यमातून झोपडीधारकांना स्वत:च पुनर्विकासाचा प्रस्ताव दाखल करता येणार

  • व्यक्तीगत तक्रारींचे सोसायटीच्या स्तरावरच निराकरण करणे शक्‍य

प्रस्तावासाठी अटी

  • सोसायटी स्थापन करण्यासाठी किमान ११ सदस्यांची गरज

  • झोपडपट्टीतील किमान ५१ टक्के सभासदांना सोसायटीचे सदस्य करणे आवश्‍यक

  • अथवा योजना सुरू असल्यास संबंधित योजनेचे विकसक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.