Pune-Jejuri Traffic Update: चला जेजुरीला जाऊ...पण थांबा वाहतूक मार्गातील बदल वाचा, खंडोबाच्या सोमवती यात्रेसाठी निर्णय

Traffic Diversions Announced for Somavati Yatra in Jejuri : यात्रेच्या निमित्ताने २ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत पुणे-जेजुरी-बारामती महामार्गावर जड वाहने आणि इतर वाहतुकीस बंदी घालून अन्य पर्यायी मार्ग वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
Traffic restrictions and diversions set for Shri Khandoba Deva's Somavati Yatra in Jejuri.
Traffic restrictions and diversions set for Shri Khandoba Deva's Somavati Yatra in Jejuri.esakal
Updated on

पुणे, दि. २८: पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेमुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी वाहतुकीत बदल करण्याचे आदेश दिले आहेत.

यात्रेच्या निमित्ताने २ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत पुणे-जेजुरी-बारामती महामार्गावर जड वाहने आणि इतर वाहतुकीस बंदी घालून अन्य पर्यायी मार्ग वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

वाहतूक बदलांची माहिती

जेजुरी पोलीस ठाणे हद्दीत: सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुण्याकडे जाणारी जड वाहतूक पूर्णपणे बंद केली जाईल आणि नीरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुण्याकडे वळवली जाईल.

जेजुरी बेलसर फाटा मार्ग: पुण्याकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली जाईल. बेलसर-कोथळे-नाझरे-सुपे-मोरगाव मार्गे बारामती, फलटण आणि साताराकडे वाहने वळवली जातील.

Traffic restrictions and diversions set for Shri Khandoba Deva's Somavati Yatra in Jejuri.
BHR Scam: पतसंस्थेने ठेवीदारांची फसवणूक केल्याचे प्रकरण चिघळले, भाजप नेत्यानंतर महिला आयपीएस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

सुपा पोलीस ठाणे हद्दीत: बारामती आणि नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुण्याकडे जाणारी वाहतूक मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने वळवली जाईल.

सासवड पोलीस ठाणे हद्दीत: पुण्याकडून जेजुरी मार्गे फलटण-सातारा बाजूकडे जाणारी जड वाहतूक पूर्णपणे बंद केली जाईल आणि सासवड-नारायणपूर-कापुरहोळ मार्गे सातारा-फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परिंचे-वीर-वाठार कॉलनी मार्गे लोणंद अशी वाहतूक वळवली जाईल.

२ सप्टेंबर रोजीच्या श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी वाहतुकीचे निर्बंध शिथिल राहतील. नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Traffic restrictions and diversions set for Shri Khandoba Deva's Somavati Yatra in Jejuri.
Pune CCTV Camera : गुन्हेगारांना खुली सूट! पुण्यातील तब्बल एक हजार सीसीटीव्ही बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.