Sakal Vidya : दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअरची सुवर्णसंधी! बारामतीत रविवारी शिक्षणतज्ज्ञ प्रा. देशमुख करणार मार्गदर्शन

दहावीच्या परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थी व पालक या दोन्ही घटकांना परिपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते.
sakal vidya
Sakal-Vidyasakal
Updated on

बारामती - दहावीच्या परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थी व पालक या दोन्ही घटकांना परिपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते. त्यांच्यासाठी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. अ. ल. देशमुख बारामतीत रविवारी (ता. २०) मार्गदर्शन करणार आहेत. दहावीच्या परीक्षेसोबतच करिअरच्या सुवर्णसंधीबाबतही येथे तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

दहावीच्या परीक्षेला सामोरे जाताना नेमकी काय तयारी केली पाहिजे? कशावर भर दिला पाहिजे? उत्तरपत्रिका नेटकेपणाने कशी लिहायची? वेळेत सर्व प्रश्नांची उत्तरे कशी लिहून काढायची याची परिपूर्ण माहिती सकाळ विद्या व मोशन ॲकॅडमीच्या वतीने उपलब्ध करून दिली जाणार आहे. करिअरच्या दृष्टीने दहावीची परीक्षा हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो.

त्यामुळे ही परीक्षा कशी द्यायची, अधिक गुण प्राप्त करण्यासाठी काय करावे, याचे परिपूर्ण मार्गदर्शन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ देशमुख करणार आहेत. बारामती येथील सूर्यनगरीतील मुक्ताई लॉन्स येथे रविवारी (ता. २०) करिअर मार्गदर्शन सेमिनार आयोजित केले आहे.

सोबतच दहावीनंतर करिअरच्या संधी काय आहेत उच्च शिक्षण कुठून व कोणत्या विषयात घ्यायचे? याबाबत शंकानिरसनही केले जाणार आहे. ‘विज्ञान शाखेतील शिक्षण आणि करिअरच्या संधी’ याबाबत, तसेच अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेश अर्थात ‘जेईई’ आणि ‘नीट’ प्रवेश प्रक्रियेबाबतही सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

दहावीनंतर पुढे कोणते शिक्षण घ्यायचे. कोणती विद्या शाखा निवडायची... इंजिनिअरिंग की मेडिकलला जायचे. याबाबत शंका निरसन करण्यासाठी ‘सकाळ विद्या’ आणि मोशन ॲकॅडमी यांच्यातर्फे ‘करिअर निवड’ विषयावर तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन केले जाणार आहेत.

दृष्टिक्षेपात

  • काय........दहावीनंतर करिअर निवड मार्गदर्शन

  • कधी... रविवार, ता. २० ऑक्टोबर २०२४

  • केव्हा....सकाळी १० वाजता

  • कुठे... मुक्ताई लॉन्स, सिटी इन चौक, सूर्यनगरी, भिगवण रोड, बारामती

  • प्रवेश-विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य

  • संपर्क- ८९७५६७३३१०.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.