निरगुडसर : भरधाव वेगात आलेली एसटी बस रस्त्यावर असलेल्या खड्डयात जोरात आदळली आणि बस वरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या वृध्द महिलेला चिरडले यात वच्छला किसन भोर (वय ६२ )या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एसटीमधील प्रवासी जखमी झाले आहेत, ही घटना रांजणी - वळती रस्त्यावर वाळूंज मळा येथे बुधवार (ता.१३ ) रोजी सकाळी घडली.
वळती(ता.आंबेगाव) येथील गावाच्या उत्तरेला वाळुंजमळा येथून सकाळी ९ .३५ वा. नारायणगावहून शिंगवेकडे ही एसटी बस वेगाने जात होती यावेळी रस्त्यात असलेल्या खड्ड्यामध्ये बस जोरात आदळली आणि एसटी बस वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस महिलेच्या अंगावर गेली त्यावेळी वच्छला किसन भोर (वय ६२ ) ही महिला रस्त्याच्या कडेने भोकरवस्तीकडे पायी जात होती.
भरधाव वेगात आलेल्या बस अपघातात महिला एसटीच्या पुढच्या भागात अडकल्याने जागेवरच मृत्युमुखी पडली,क्रेनच्या सहाय्याने एसटी बाजुला करून मृत्युमुखी पडलेल्या महिलेला काढण्यात आले,अपघात इतका भयंकर होता की , त्यात त्या महिलेचा एक पाय तुटुन बाजुला पडला होता.
तसेच गेनभाऊ विठ्ठल वाळुंज यांची क्रुझर जीप त्यांच्या शेडमध्ये उभी होती ती बस सरळ जीपवर आदळून सखाराम बबन वाळुंज यांचे घरावर धडकुन थांबली.या घटनेत जीपचे व घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .घटनास्थळी पोलीस प्रशासन व एसटी महामंडळ तब्बल एक तासाने आले,एसटी मधील प्रवासी देखील जखमी झाले असून जखमी झालेल्या प्रवाशांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात तसेच खासगी दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्यात आले .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट )चे कार्याध्यक्ष देवदत्त निकम , शरद बँकेचे संचालक शिवाजीराव लोंढे , राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष धोंडीभाऊ भोर , खरेदी विक्री संघाचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे , जयसिंग थोरात , सरपंच आनंद वाव्हळ , उपसरपंच तेजस भोर यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.