Pune News : ‘सकाळ’च्या वृत्तानंतर एसटी आगार व्यवस्थापक अॅक्शन मोडमध्ये; स्वच्छतागृहांच्या ठेकेदारावर होणार कारवाई

सार्वजनिक स्वच्छतागृहे नागरिकांसाठी मोफत असताना एसटी स्थानकांवर मात्र प्रवाशांची लूट सुरू असल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत समोर आले.
toilets
toiletssakal
Updated on

कात्रज/शिवाजीनगर - सार्वजनिक स्वच्छतागृहे नागरिकांसाठी मोफत असताना एसटी स्थानकांवर मात्र प्रवाशांची लूट सुरू असल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत समोर आले आहे. ‘सकाळ’ने या विषयाला वाचा फोडल्यानंतर स्वारगेट आणि वाकडेवाडी येथील एसटी आगार व्यवस्थापक अॅक्शन मोडवर आले आहेत. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

‘ठेकेदारांनी चोरली पुण्याची स्वच्छ्तागृहे’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ने आज वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर नागरिकांनी ‘सकाळ’कडे प्रतिक्रियांच्या स्वरूपात भावना व्यक्त केल्या. पुणे स्टेशनवर असाच प्रकार सुरू आहे. त्याचबरोबर महापालिकेची स्वच्छतागृहेही किळसवाणी असल्याचे मत तेजस सैटवाल यांनी व्यक्त

केले.

सार्वजनिक स्वच्छतागृह या महत्त्वाच्या संवेदनशील विषयाला हात घातल्याबद्दल ‘सकाळ’चे आभार! पैसे घेऊन तरी अशी सार्वजनिक स्वच्छतागृहे स्वच्छ असणे अपेक्षित आहे. लाखोंच्या संख्येने लोक एसटीने प्रवास करत असतात, त्यामुळे अशा ठिकाणांहून रोगराई पसरू शकते.

- श्रद्धा कुलकर्णी, प्रवासी

पुण्यात अशा प्रकारे स्वच्छतागृह चालवणारे बरेच ठेकेदार आहेत. विशेष म्हणजे रेल्वे आणि बसस्थानकांच्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. तरच नागरिकांना दिलासा मिळेल.

- वेंकटेश पाटील, नागरिक

फक्त एसटी बसस्थानकावरीलच नव्हे, तर रेल्वे स्थानकावरील स्वच्छतागृहांतसुद्धा हे ठेकेदार प्रवाशांची लूट करतात. शौचालयाचे शुल्क स्वच्छतागृहाबाहेर लिहिलेले असतानादेखील हे ठेकेदार दुप्पट शुल्क आकारतात. याबाबत विचारणा केली असता ते जुने शुल्क आहे, असे उत्तर देतात.

- भूषण गोरे, नागरिक

प्रवाशांच्या तक्रारी आल्याने संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याबातचा अहवाल विभागीय कार्यालयांकडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर काय कारवाई करायची, हे वरिष्ठ ठरवतील.

- ज्ञानेश्वर रणवरे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक, वाकडेवाडी

आगार व्यवस्थापकांना जाग

1) ‘सकाळ’च्या वृत्तानंतर एसटी प्रशासनाला जाग

2) आगार व्यवस्थापकांकडून स्वच्छतागृहांची पाहणी

3) मुतारीसाठी प्रवाशांकडून पैसे न घेण्याच्या सूचना

4) महिलांची पैशांसाठी अडवणूक करू नये

5) पैसे घेऊन सेवा देताना स्वच्छता असायला हवी

6) प्रवाशांच्या तक्रारी वाढल्याने कारवाई करणार

7) कारवाईचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविणार

8) शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.