पुणे - स्थायी समितीमध्ये निविदा मंजूर झाल्यानंतर ठेकेदाराने करारनामा करून घ्यावा त्यानंतरच खात्याने वर्कऑर्डर द्यावी असे आदेश जुलै महिन्यात काढले होते. त्यामुळे ठेकेदारांच्या मनमानीला चाप लागला होता. मात्र, आता आचारसंहितेमध्ये कामे अडकू नयेत यासाठी करारनामा न करताच वर्कऑर्डर देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे. अवघ्या तीन महिन्यात प्रशासनाने स्वतःचा निर्णय बदलल्याने ठेकेदारांची दिवाळी झाली आहे.