निरगुडसर - विविध खेळांतून महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देत राज्याची मान उंचविणाऱ्या ९५ आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंना कोणतीही परीक्षा आणि कोणत्याही मुलाखतीशिवाय राज्य शासनाने थेट नियुक्ती देत सरकारी नोकरी दिली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील चार आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंना महाराष्ट्र शासनाची नोकरी प्राप्त झाली असून यात आंबेगाव तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील कन्या काजल भोर हिचादेखील समावेश आहे.