Supriya Sule: राज्य सरकारला पॉलिसी पॅरालिसीस झाला; खासदार सुप्रिया सुळे यांची टीका

बारामती तालुक्यातील सस्तेवाडी, मगरवाडी, वाकी, चोपडज, चौधरवाडी, करंजे, शेंडकरवाडी या गावांमध्ये गुरुवारी (ता. २८) सुप्रिया सुळे यांचा संपर्क दौरा पार पडला. याप्रसंगी भापकरमळा येथे तानाजी भापकर यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका मांडली.
NCP MP supriya sule
NCP MP supriya sule Esakal
Updated on

सोमेश्वरनगर : ‘‘आशा सेविका, अंगणवाडी सेविका, डॉक्टर आंदोलन करत आहेत. शेतकरी, दूध उत्पादक, शिक्षकांना न्याय मिळत नाही. कुणीच सुखी नाही. सरकार फक्त आणि फक्त मोठे कंत्राटी प्रकल्प चालवत आहे. ह्याचं घर फोडा, त्याचा पक्ष फोडा, हे एकमेव काम या ट्रीपल इंजिन खोके सरकारकडून सुरू आहे. राज्य सरकारला पॉलिसी पॅरालिसीस (धोरण लकवा) झालेला आहे,’’ अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

बारामती तालुक्यातील सस्तेवाडी, मगरवाडी, वाकी, चोपडज, चौधरवाडी, करंजे, शेंडकरवाडी या गावांमध्ये गुरुवारी (ता. २८) सुप्रिया सुळे यांचा संपर्क दौरा पार पडला. याप्रसंगी भापकरमळा येथे तानाजी भापकर यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका मांडली. याप्रसंगी ज्येष्ठ नेते सतीश खोमणे, अॅड. एस. एन. जगताप, उद्योजक राजेंद्र जगताप, महिला नेत्या वनिता बनकर, माजी सरपंच प्रदीप कणसे, प्रदीप शेंडकर आदी उपस्थित होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘इडी, सीबीआयच्या नव्वद टक्के धाडी या विरोधी पक्षाच्या लोकांवर टाकल्या आहेत. प्रियांका गांधी सक्रिय झाल्या की वड्रा यांचं नाव कुठेतरी येणारच. संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भांडले म्हणून त्यांनी माझं आणि अमोल कोल्हे यांचं निलंबन केलं, ही दडपशाही आहे.’’

‘‘महाविकास आघाडीला सर्वेक्षणात चांगल्या जागा दिसल्या तरी कॅप्टन कुल धोनीप्रमाणे आनंदी वा दुःखी होणार नाही. लोकसभेच्या जागावाटपाबाबत बंद खोलीत चर्चा होईल आणि पुढील आठवड्यात महाविकास आघाडीतील सर्व पक्षांना योग्य तो न्याय मिळालेला दिसेल,’’ असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. तसेच, ‘‘मनोज जरांगे पाटील लोकशाही मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून आंदोलन करत आहेत. आतापर्यंत मराठा, धनगर, मुस्लीम, लिंगायत या समाजाला न्याय देण्यात सरकारला अपयश आलेलं आहे,’’ अशी टीकाही सुळे यांनी केली.

NCP MP supriya sule
Ayodhya News : पंतप्रधान मोदींच्या रोड- शो, जाहीर सभेसाठी अयोध्येत जय्यत तयारी

मोदी यांना टोला, गडकरी यांचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये येणार आहेत, त्यांचं अतिथी देवो भवः या राज्याच्या संस्कृतीप्रमाणे स्वागतच आहे. मात्र, नाशिकमध्ये आल्यावर त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्यावं. कांदा निर्यातबंदीचा चुकीचा निर्णय मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी कोपरखळी सुप्रिया सुळे यांनी मारली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शरद पवार यांचे कौतुक केले, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. त्यांचे व पवार कुटुंबाचे चाळीस वर्षांचे ऋणानुबंध आहेत. तेही महाराष्ट्राचे व देशाचे दिलदार नेते आहेत, असे कौतुकही त्यांनी केले.

NCP MP supriya sule
Corona Patient : आंबेगाव तालुक्यात चार कोरोनाचे रुग्ण; प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.