नारायणगाव - कोरोना प्रतिबंधक विषयक निर्गमित केलेल्या नियमांचे पालन करून लोकनाट्य तमाशा मंडळाचे (Tamasha Mandal) सांस्कृतिक कार्यक्रम खुल्या मैदानात करण्यास राज्य शासनाने (State Government) परवानगी दिली आहे. यामुळे तमाशा मंडळाच्या कार्यक्रमाच्या परवानगीसाठी फडमलकांना नाहक त्रास होणार नाही. याबाबतच्या सूचना प्रभारी पोलीस अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. याबाबतचा आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी राज्यातील पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना काल दिले आहेत. यामुळे आज पासून कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाजवळ करण्यात येणारे नियोजित आत्मदहन आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. अशी माहिती मराठा तमाशा लोकक लावंत परिषदेचे अध्यक्ष संभाजी जाधव यांनी दिली.
लोकनाट्य तमाशा मंडळाचे कार्यक्रम खुल्या मैदानात करण्यास राज्याच्या मदत पुनर्वसन विभागाने परवानगी दिली होती. त्यानुसार ३० नोव्हेंबर २०२१ रोजी पोलीस महासंचालक यांनी परिपत्रक काढून जिल्हा पोलिस अधीक्षक यांना पाठवले होते. या मुळे लोकनाट्य तमाशा मंडळाचे कार्यक्रम करण्याची तयारी राज्यातील तंबूच्या फडमलकांनी केली होती. मात्र लोकनाट्य तमाशा मंडळाचे कार्यक्रम करण्यास राज्याच्या विविध भागांतील तालुक्यातील स्थानिक पोलीस प्रशासन परवानगी देत नसल्याची तक्रार जाधव यांनी केली होती. यामुळे कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळा जवळ १५ डिसेंबर २०२१ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा मराठा तमाशा लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष संभाजी जाधव यांनी दिला होता. याबाबतचे वृत्त दै. सकाळ (ता.१०) मध्ये प्रसिद्ध झाले होते. जाधव यांच्या इशाऱ्याची दखल घेऊन मंगळवारी (ता. १४) मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, आमदार अतुल बेनके, लोककला अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, डॉ. गणेश चंदनशीवे, खंडूराज गायकवाड, संभाजी जाधव उपस्थित होते. यावेळी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ११ नोव्हेंबर २०२१ रोजी दिलेल्या शासन निर्णया नुसार सांस्कृतिक कार्यक्रम व लोकनाट्य तमाशा मंडळाचे कार्यक्रम खुल्या मैदानात अथवा बंदिस्त सभागृहात करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे तमाशा मंडळाच्या कार्यक्रमाच्या परवानगीसाठी फडमलकांना नाहक त्रास होणार नाही. याबाबतच्या सूचना प्रभारी पोलीस अधिकारी यांना देण्यात याव्यात.या बाबतच्या आदेशाचे पत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी राज्यातील पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना दिले. या आदेशाची प्रत उपमुख्यमंत्री पवार व गृहमंत्री वळसे पाटील यांच्या हस्ते जाधव यांना देण्यात आली. यामुळे नियोजित आत्मदहन आंदोलन स्थगित करण्यात आले.
संभाजी जाधव (मराठा तमाशा लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष) - आमदार बेनके यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री पवार, गृहमंत्री वळसे पाटील यांनी तमाशा फडमलकांच्या अडचणीची तातडीने दखल घेतल्याने लोकनाट्य तमाशा मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम खुल्या मैदानात करण्याची अडचण दूर झाली आहे. यामुळे मागील दोन वर्षे अडचणीत असलेल्या फडमलकांना दिलासा मिळाला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.