इंदापूर - केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना राज्य सरकारने (State Government) केलेली अटक (Arrested) ही राज्य सरकारच्या झुंडशाहीचे लक्षण आहे. राज्य सरकारने आता सुरवात केली आहे. मात्र, त्याचा शेवट आम्हीच करू असा इशारा देत राज्य सरकारच्या तुघलकी कार्यपद्धतीचा जाहीर निषेध (Protest) व धिक्कार आहे. राज्य सरकारची झुंडशाही व महाराष्ट्र पोलिसांचा गैरकारभार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश पक्षप्रतोद तथा आमदार आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी दिला.
शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्यावरआयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील, निरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, संचालक राजवर्धन पाटील, उदयसिंह पाटील, विलास वाघमोडे, मारुतराव वणवे, माऊली चवरे, ऍड शरद जामदार, गजानन वाकसे, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रताप पाटील, दादासो घोगरे, हरिदास घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगिता पोळ, कमाल जमादार उपस्थित होते.
श्री. शेलार पुढे म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार एका सध्या क्लिप वरून नारायण राणे यांना अटक करत असेल तर आमच्याकडे तीन तासांचा सिनेमा होईल इतक्या सीडी आहेत. नारायण राणे यांनी कोणताही गुन्हा केला नाही, असे सांगून सुद्धा त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे राज्य सरकार झुंडशाही करणार असेल तर आम्ही तांडव केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. राज्य सरकारने हा तमाशा बंद केला नाही तर राज्यसरकारचे मंत्री अनिल परब यांची क्लिप बाहेर काढण्याचे सूतोवाच त्यांनी केले. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या पाठीवर काठ्या मारल्या पाहिजेत, हे काँग्रेस नेतेराहुल गांधी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जोड्याने मारले पाहिजे हे वक्तव्य आम्ही सहन केले. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य करताना संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. त्यावर पडदा पडल्यानंतर झालेली कारवाई चुकीची आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांस देशआझादीचा हिरक महोत्सव आहे का अमृत महोत्सव आहे हे समजत नाही. मात्र विरोधी देशास आनंद वाटावा असे वक्तव्य करणे हे देश विरोधात कृत्य आहे. अफगाणिस्तान मध्ये तालिबानीसुद्धा शरमेने आत्महत्या करतील अशी झुंडशाही या सरकारची आहे. त्यामुळे आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. राज्यातील सहकार सर्वसमावेशक आहे. मात्र, गेल्या दोन वर्षात सहकाराच्या मूळ प्रेरणेस धक्का बसत आहे, शेतकऱ्यांचे पैसे वेळेत मिळत नाही, सहकारीऐवजी खाजगी कारखाने उभे राहून कारखानदारांचे इमले उभे राहत आहेत. मुख्यमंत्री व खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर शेतकरी आत्महत्या करायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सहकारास गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी अमित शहा हे केंद्रीय सहकार मंत्री झाले आहेत. त्यास गती देण्याचे काम राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील करत आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय भवितव्य उज्वल असल्याचे सूतोवाच त्यांनी शेवटी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.