Pune news : पुण्यात बुधवारी राज्यस्तरीय बँकिंग परिषद

पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेडतर्फे बुधवारी (ता. ६) राज्यस्तरीय बँकिंग परिषद आयोजित केली आहे.
PUNE
PUNESAKLAL
Updated on

पुणे : नागरी सहकारी बँकांमध्ये रेग्युलेटरी कम्प्लेयन्स आणि आयटीचा उपयोग कशा प्रकारे व्हावा, त्याबाबत आव्हाने आणि संधी काय आहेत, याविषयावर चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेडतर्फे बुधवारी (ता. ६) राज्यस्तरीय बँकिंग परिषद आयोजित केली आहे.

परिषद पुणे रेल्वे स्टेशनजवळील हॉटेल शेरेटॉन ग्रँड येथे रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी ५.३० यावेळेत होणार आहे. या परिषदेत पुण्यासह इतर जिल्ह्यातील ११२ हून अधिक बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, संगणक विभाग प्रमुख व पदाधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी उपाध्यक्ष अ‍ॅड. साहेबराव टकले, संचालक नीलेश ढमढेरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ.अनिल कारंजकर उपस्थित होते. बुधवारी सकाळी राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या हस्ते परिषदेचे उद्‍घाटन होणार आहे. यावेळी सुभाष मोहिते, बाळासाहेब अनास्कर, अतुल खिरवाडकर, आमदार संजय जगताप, विजय ढेरे, रमेश वाणी, मिलिंद काळे, नीलेश ढमढेरे, माजी आमदार नामदेव पवार यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

PUNE
Pune : इंद्रायणीचे प्रदूषण मुख्यमंत्र्यांच्या दरबारी,प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कार्यवाही सुरू

अ‍ॅड. सुभाष मोहिते म्हणाले, ‘‘परिषदेमध्ये नागरी सहकारी बँकांचे नियामक अनुपालन आदी विषयांवर चर्चा होणार आहे. यामध्ये विद्याधर अनास्कर, जयंत काकतकर, अपेक्षिता ठिपसे, राजेंद्र गांगुर्डे, प्रदीप भोईर, अतुल खिरवाडकर, विक्रांत पोंक्षे, अ‍ॅड. राजेश पिंगळे आदी मान्यवर परिषदेत उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

PUNE
Sachin Sawant : लोकसभा निवडणुकांनंतर मोदी सरकारच बुलडोजरखाली आल्याशिवाय राहणार नाही - सचिन सावंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.