टाकळी हाजी ः वर्षोनुवर्षे प्रपंचाचा गाडा हाकण्यासाठी गावा बाहेर मुक्काम करायचा, तीन दगडाच्या चुल मांडून प्रपंच थाटायचा. उन्हातान्हात दगडाला टाकीचे घाव देऊन आकार द्यायचा. त्यातून तयार होणाऱ्या दगडी वस्तू जाते, पाटा, वरवंटा, खलबत्ता डोक्यावर नेऊन वाडीवस्तीवर विकायच्या. त्यातून मिळणाऱ्या पैशातून कसा बसा प्रंपच चालवणारा पिचलेला समाज आजही पाहवयास मिळतो.
ग्रामीण भागात जाते, पाटा व वरवंट्याला आजही महत्व दिले जाते. भल्या पहाटे उठून ओवीवर धान्य दळणाऱ्या महिला असे चित्र आता दुर्मिळ झाले असेल तरीही हा समाज आजही दगड घडवित या वस्तू बनवित आहे.
नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातून कोवीद जातीचा हा दगड आणला जातो. साधारण तिनशे ते चारशे दगड आणून एखाद्या गावाबाहेर मुक्काम करून रहायचे. तिथेच तीन दगडाची चूल मांडून स्वयंपाक करायचा. भल्या पहाटे उठून या दगडाला घडविण्याचे काम करतानाचे चित्र आजही ग्रामीण भागात पहावयास मिळते.
जाते तयार करताना त्यावर नक्षी काम करून त्याला सुभोभिकरण करण्यात येते. हे जाते साधारण 500 ते 600 रूपयांपर्यंत विकले जाते. पाटा व वरवंटा साधारण 400 ते 500 रूपये खलबत्ता 200 रूपयांना विकला जातो. तांत्रीक युगात घरोघरी धान्य़ दळण्यासाठी विजेवरच्या गिरणी, मिक्सर उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे या वस्तूंची मागणी घटल्याचे दिसून येते. मात्र हिरवी, लाल मिरची पाट्यावर वाटून त्याची चवच न्यारी म्हणणारे खवय्ये आजही ग्रामीण भागात आढळतात.
मात्र या दगडी वस्तू एकदा खरेदी केल्यावर पिढ्यान्पिढ्या वस्तू खरेदी कराव्या लागत नाही. त्यामुळे मागणी घटल्याने हा समाज आजही आर्थिकदृष्टा मागे राहिल्याचे चित्र आहे. आठ महिने भटकंतीवर असणाऱ्या या कुटूंबामध्ये शिक्षणाची उणीव पहावयास मिळते.
आमच्या पिढ्यान् पिढ्या चालणारा हा व्यवसाय आहे. दिवसातून एक ते दोन वस्तू विकल्या जातात. त्यावर आम्ही प्रपंच चालवतो.
-जालिंदर धोत्रे, दगड घडविणारा कारागिर नेवासा, नगर
दगड घडविण्याची ही कला पारंपरीक आहे. ग्रामीण भागात लग्न कार्यात हळद दळण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यामुळे याची मागणी काही अंशी टिकून आहे.-बबन गायकवाड, दग़ड घडविणारा कारागीर नेवासा, नगर
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.