पुणे - अनेक वर्षांपासून डोंगरांवर (Hill) चुकीच्या पद्धतीने बांधकामे, (Construction) वृक्षतोड (Tree Cutting) केली जात आहे, त्यामुळे जैवविविधतेचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे (Rain) डोंगरावरील मातीची धूप होऊन धरणातील पाण्याचा रंग बदलणे हे काय आत्ताच झाले नाही. यंदा जास्त पाऊस झाल्याने हा प्रकार निदर्शनास आला आहे. डोंगराचा विध्वंस थांबविला नाही तर पुढील काळात यापेक्षाही मोठ्या दुर्घटना घडतील असा इशारा ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ (Dr madhav Gadgil) यांनी दिला आहे. (Stop the Destruction Otherwise Big Things will Happen)
जुलै महिन्यात पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाला, त्यामुळे या भागातील डोंगरांवरील माती खरडून निघाली आहे, शेत जमीन वाहून जाऊन थेट धरणात आली आहे. पाऊस थांबलेला असला तरी अद्यापही या भागातील ओढ्यांमधून तांबडी माती मिश्रित झालेले पाणी वाहत आहे. किरकटवाडी-नांदोशी पासून ते पानशेतपर्यंत खाणीसाठी, बंगले, रिसॉर्टसाठी डोंगर फोडले आहेत. चुकीच्या पद्धतीने रस्ते केले आहेत, त्यासाठी झाडे तोडण्यात आली आहेत. यामुळे माती धरणात वाहून आल्याने कित्तेक वर्षात प्रथमच खडकवासला धरणातील पाण्याचा गढूळपणा २०० नेफोलोमॅट्रीक टर्बिडीटी युनिट (एनटीयू) पर्यंत गेली आहे. याबाबत डॉ. माधव गाडगीळ यांना विचारले असता त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
गाडगीळ म्हणाले, ‘१९७१ मध्ये पानशेत व या भागात धरण क्षेत्रातील देवराईचा अभ्यास केला तेव्हा पुण्यात लाकडी कोळश्याला मोठ्याप्रमाणात मागणी होते. त्याकाळी वन, जलसंपदा, वखार विभागाचे अधिकारीच ग्रामस्थांना ५० पैसे दराने एक झाड विकण्यास सांगत होते. डोंगरामधील संरक्षित असलेले जंगल तोडले गेल्याने तेव्हापासूनच जमिनीची धूप सुरू आहे. दगड खाणी, रस्ते बांधणी यामुळे हवेत धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम वातावरणावर झाला आहे. कमी वेळेमध्ये प्रचंड पाऊस पडणे यामध्ये हे एक कारण आहे.
यंदा याच पद्धतीने पाऊस झाल्याने सह्याद्रीच्या पर्वत रागांमध्ये दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. समुद्राचे तापमान वाढत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळेच चक्रीवादळे कोकण किनारपट्टीला धडकत आहेत. चुकीच्या पद्धतीने डोंगरफोड व झाडे तोडली जात असल्याने जैवविविधतेचे नुकसान होत असल्याने हे परिणाम भोगावे लागत आहेत. या डोंगराचे, जंगलाचे संवर्धन न केल्यास यापेक्षाही मोठ्या दुर्घटना घडतील, असा इशारा माधव गाडगीळ यांनी दिला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.