Breaking : पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा विचित्र अपघात

Accident_Navale_Bridge
Accident_Navale_Bridge
Updated on

कात्रज (पुणे) : मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर कात्रजजवळ असलेला नवले पूल हा सतत होणाऱ्या अपघातांमुळे सतत चर्चेत असतो. नवले पुलावरील ही अपघातांची मालिका सुरूच असून सोमवारी (ता.१५) आणखी एक विचित्र अपघात या ठिकाणी झाला. कात्रजकडून वडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर चार वाहने एका मागोमाग धडकल्याने हा अपघात झाला.

छोट्या पिकअपने ब्रेक मारल्याने त्याच्या मागे असणारा कंटेनर पाठीमागून धडकला. त्यामागे असणारी फॉर्च्युनर गाडी कंटेनरला धडकली. त्यानंतर फॉर्च्युनरला डिझेल टँकरने पाठीमागून धडक दिली. सुदैवाने यामध्ये एकही व्यक्ती जखमी झाली नसली तरी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये फॉर्च्युनर गाडीचे बरेच मोठे नुकसान झाले आहे. फॉर्च्युनर गाडीला पाठीमागून आणि पुढच्या अशा दोन्ही बाजूंनी धडक बसली आहे. नवले पुलाजवळ असलेल्या उतारावर पिकअपने ब्रेक मारल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदयसिंह शिंगाडे यांनी दिली.

अपघातामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती, पण भारती विद्यापीठ वाहतूक पोलिसांनी तत्काळ वाहतूक कोंडी सोडविली. या पूल परिसरात वारंवार अपघाताच्या घटना घडत असतात, त्यामुळे वाहतूक पोलिस तसेच महामार्ग पोलिसांनी या भागातील वाहतुकीकडे आणखी लक्ष्य द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. 

दरम्यान, गेल्याच आठवड्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले पूल ते कात्रज दरम्यानच्या रखडलेला रस्ता आणि भुयारी मार्गाचा विषय लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित केला होता. त्यावर पुढील सहा महिन्यात हा प्रश्न निकालात निघेल, असं आश्वासनही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()