पुणे महापालिका कर्मचाऱ्यांचा अजब कारभार पात्र टेंडरला केले अपात्र

हा घोटाळा केल्याचा प्रकार असल्याचे सांगत,संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा गुन्हा दाखल करावा
पुणे महापालिका
पुणे महापालिकाsakal
Updated on

शिवाजीनगर : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० (क) मधील ड्रेनेज लाईन, सांस्कृतीक हॉल यांसारख्या विकासकामांचे ०९ टेंडर उपायुक्त क्र.२ यांनी पात्र ठरवले होते. मात्र, ई-टेंडर पास करत असताना उर्वरित टेंडर सेल कर्मचाऱ्यांनी ०९ पैकी ४ टेंडरवर बॅंकेचे कारण देत हाताने लिहून अपात्र ठरवण्याचा प्रताप केला आहे. हा घोटाळा केल्याचा प्रकार असल्याचे सांगत,संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा गुन्हा दाखल करावा. अशी तक्रार जय श्रीराम कन्ट्रक्शनचे ठेकेदार सुनिल चव्हाण यांनी डेक्कन पोलिस ठाणे येथे केली.

प्रभाग क्रमांक १० (क) मधील रखडलेल्या विविध विकासकामांचे सुमारे १० लाख रुपयांचे ०९ टेंडर काढण्यात आले . ०९ पैकी ०९ टेंडर ब पाकिट उघडण्याच्या नमुना पत्रावर उपायुक्त क्र.२ यांनी पात्र करून देखील त्यानंतर संबंधित टेंडर कर्मचारी ई-टेंडरवर ऑनलाईन नोंदणी करत असताना ०९ पैकी केवळ ५ टेंडर पात्र असल्याची नोंद केली. उर्वरित ४ टेंडरवर खाडाखोड करून "पात्र"च्या ठिकाणी "अपात्र" अशी नोंद केली.

०९ पैकी ०५ टेंडर पात्र ठरले परंतू, एक ते दीड महिना उलटूनही ४ टेंडरबद्दल अधिकची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे, जय श्री राम कंन्ट्रक्शनचे ठेकेदार सुनिल चव्हाण उपायुक्त क्र.२ येथील कार्यालयात गेले. त्यानंतर संबंधित टेंडर कर्मचाऱ्यांशी याबद्दल विचारणा केली असताना संबंधित सेवकांनी उत्तरे देण्यात टाळाटाळ केली. त्यामुळे ठेकेदाराच्या डोक्यात संशयाचा भोवरा निर्माण झाल्यामुळे ई-वेबसाईटवर जावून पडताळणी केली असताना ०९ पैकी ०५ पात्र आणि ४ अपात्र ठरवले असल्याचे दिसून आले.

"संबंधित प्रकरणाची माहिती घेतल्याशिवाय मला काही बोलता येणार नाही"

- नितीन उदास उपायुक्त महापालिका

"पात्र करून फायली आम्ही खाली पाठवल्या होत्या, अपात्र बघून आम्ही देखील शॉक झालो.पात्र च्या समोर आणि पाठीमागे दोन रेषा ओढतो जेणेकरून इतर कोणी 'अ' जोडू नये म्हणून,परंतू रेष ओढली असताना देखील,त्या रेषेच्या समोर अ लिहिलं आहे. ऑक्टोंबरला पात्र केल्याचे फोटो देखील माझ्याकडे आहेत.यावरती काय कारवाई करायची ते उपायुक्त ठरवतात."

- स्वप्नील खोत, कनिष्ठ अभियंता महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.