दाढी केली म्हणून पोलिसांची बदली, त्याला कारणही तसेच आहे...  

kuting
kuting
Updated on

जुन्नर (पुणे) : येथे बंदोबस्तावर असताना लॉकडाउनच्या काळात केशकर्तनालयात दाढी व फेशियल करून घेताना शनिवारी (ता. 2) पकडलेल्या राखीव पोलिस दलाच्या दोन जवानांवर जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी तातडीने कारवाई केली. या जवानांची बारामती येथे बदली करण्यात आली असून, खातेनिहाय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळातही जुन्नर शहरात बांधकामे सुरू असल्याचे प्रकरण ताजे असतानाच शनिवारी शटर बंद करून केशकर्तनालयात कामकाज सुरू असल्याचे उघडकीस आले. याबाबतची चित्रफीत समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने जुन्नरला लॉकडाउनचा पुरता फज्जा उडाला असल्याचे दिसून येत आहे. 

जुन्नर येथे बंदोबस्तावर असलेले राखीव पोलिस दलाचे दोन जवान लॉकडाउनच्या काळात केशकर्तनालयात दाढी व फेशियल करून घेत होते. त्यांना नाभिक संघटनेचे तालुका उपाध्यक्ष सचिन कालेकर व शहर अध्यक्ष सतीश डाके यांनी पकडले. जुन्नरच्या प्रभारी अधिकारी पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी या घटनेची दखल घेतली असून, कालेकर व डाके यांची तक्रार दाखल करून घेतली आहे. तसेच, दुकान चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे कालेकर यांनी सांगितले. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी तातडीने कारवाई केली. या जवानांची बारामती येथे बदली करण्यात आली असून, खातेनिहाय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनच्या काळात केशकर्तनालय दुकाने बंद ठेवण्याचे आदेश सर्व दुकानदारांना नगर पालिका व पाडळी ग्रामपंचायतीमार्फत बजावण्यात आले होते. मात्र, भर बाजारपेठेतील पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नगर पालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळ्यात असणाऱ्या या दुकानात शटर लावून राजरोसपणे दाढी कटिंग केली जात असल्याचा तक्रारी होत्या. पोलिसच दुकानात येत असल्याने चालकाची अरेरावी वाढली होती. कायद्याचे रक्षण करणारे, सर्वसामान्यांना हातातल्या काठीने जरब बसविणारे पोलिसच कायदा मोडत असल्याचे या निमित्ताने आढळून आले आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.