Baramati: शाळा महाविद्यालयांबाहेर वावरणा-या शालाबाह्य मुलांवर कारवाई होणार

Baramati: बारामतीत पोलिसांनी घेतली कठोर भूमिका....
Strict action to be taken against students found outside schools in Baramati
Strict action to be taken against students found outside schools in Baramati Sakal
Updated on

बारामती: या पुढील काळात शाळेच्या बाहेर शालाबाह्य विद्यार्थी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, प्रत्येक शाळा व महाविद्यालयांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह पोलिसांशी सातत्याने संपर्क ठेवावा असे आवाहन बारामतीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी केले.

शहरातील एका महाविद्यालयात झालेल्या खूनाच्या घटनेनंतर आता पोलिस विभाग सतर्क झाला असून आज शाळांच्या प्रमुखांना बोलावून सुसंवाद साधण्यात आला.

शहरातील पंचायत समितीच्या सभागृहात अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, तहसिलदार गणेश शिंदे यांनी माध्यमिक, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, वसतिगृह प्रमुखांशी संवाद साधला.

Strict action to be taken against students found outside schools in Baramati
Students Attendance : हजेरी ‘रजिस्टर’वरच; ‘ॲप’चे काय? यंदाच्या वर्षात अनेक ‘ॲप’ पडले बंद; अशैक्षणिक कामांना शिक्षकांचा विरोधच

वैभव नावडकर म्हणाले, माजी संघटनांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशोगाथा विद्यार्थ्यांपुढे मांडाव्यात, त्या पासून प्रेरीत होऊन विद्यार्थ्यांनी चांगले करिअर घडवावे.

या बैठकीमध्ये प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकांनी आपली मते मांडली. या पुढील काळात आपल्या संस्थेत होणा-या घटनांबाबत पोलिस प्रशासनाशी समन्वय ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीस 145 संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अनेक प्राचार्य, शिक्षकांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत काही सूचना केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.