Caste Certificate: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता मिळवा झटपट जात वैधता प्रमाणपत्र; वाचा सविस्तर

पुणे शहर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेले जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा जात पडताळणी समितीच्या महिनाभर मोहीम राबविली जाणार आहे.
Caste Certificate
Caste Certificate
Updated on

पुणे - पुणे शहर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेले जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा जात पडताळणी समितीच्या महिनाभर मोहीम राबविली जाणार आहे. यानुसार येत्या २६ जुलैपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार असून, यामध्ये विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शाळा शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेतच जात प्रमाणपत्र देण्याबरोबर इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेले, बारावी विज्ञान उत्तीर्ण होऊन सीईटी परीक्षा दिलेल्या आणि तृतीय वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे पुणे जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष डॉ. प्रवीण देवरे यांनी सांगितले.

Caste Certificate
Lok Sabha 2024: लोकसभेवरून रणसंग्राम; काँग्रेसने हट्ट सोडला नाही, तर...; राष्ट्रवादीच्या आमदाराचा इशारा

दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि शाळांचे मुख्याध्यापक आदींच्या संयुक्त सहकार्यातून नियोजन व सक्षम कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे.

मागासवर्गीय प्रवर्गातील कोणीही विद्यार्थी जात प्रमाणपत्रापासून वंचित राहू नये, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेत शाळा व महाविद्यालये हे आपापल्या शाळा व महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे परिपूर्ण अर्ज घेतील आणि जिल्हा जात पडताळणी समितीकडे पाठवतील, असे नियोजन केले जाणार असल्‍याचे देवरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

जात पडताळणी कोणासाठी आवश्‍यक

- नुकतेच १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी

- बारावीनंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी

-‘एमएचटी-सीईटी’, ‘नीट’, ‘जेईई’ परीक्षा दिलेले विद्यार्थी

- एमबीए, पीएच.डी, बी.एस्सी (अॅग्री), बी. फार्म, बी.एस्सी (नर्सिंग)आदी प्रवेशासाठी अनिवार्य

- अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणारे.

Caste Certificate
२०१९चे निकाल जागावाटपाचा निकष होऊ शकत नाही; काँग्रेसच्या आढावा बैठकीत प्रमुख नेत्यांचे एक मत lok sabha election 2024

जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्‍यक कागदपत्रे

- आॅनलाइन पद्धतीने भरलेल्या अर्जाची मूळ प्रत

- अर्जदार विद्यार्थ्याचे जात प्रमाणपत्र

- विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला

- वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला.

- महाविद्यालयाचे शिफारस पत्र

- शपथपत्र

- बोनाफाईड दाखला.

आॅनलाइन अर्ज कोठे भरावा?

जात पडताळणी प्रमाणपत्र घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा आणि या अर्जाची प्रिंट काढून घेणे आवश्‍यक आहे. अधिक माहितीसाठी बार्टीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

त्रुटीच्या पूर्ततेसाठी मेसेजद्वारे निरोप

दरम्यान, ज्यांनी याआधी जात वैधता प्रमाणपत्राकरिता अर्ज सादर केले आहेत. परंतु त्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्याने ते मंजूर होऊ शकलेले नाहीत. अशा सर्व विद्यार्थांना त्रुटींची पुर्तता करण्याबाबत मोबाईल आणि ई-मेलद्वारे मेसेज (संदेश) पाठविण्यात आलेले आहेत.

याबाबत संदेश प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना देण्यात आलेल्या सूचनेनुसार आवश्यक त्या कागदपत्रांसह त्रुटींची पूर्तता करण्यासाठी जिल्हा जात पडताळणी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणे अनिवार्य आहे. अशा विद्यार्थ्यांनी त्वरित त्रुटींची पुर्तता करणे आवश्‍यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.