पाचवी आणि आठवी स्कॉलरशिपचा निकाल जाहीर करा; विद्यार्थी संघटनांची मागणी

Scholarship
Scholarship
Updated on

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल रखडला आहे. हा निकाल त्वरीत जाहीर करावा, अशी मागणी परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्याकडे सुराज्य विद्यार्थी संघटनेने केली आहे.

फेब्रुवारी २०२० महिन्यात शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी २० लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ऑगस्ट महिना अर्धा संपला तरी अद्याप निकाल लागला नाही. तसेच २०२०-२१ वर्षातील परीक्षेचे वेळपत्रक जाहीर झालेले नाही. याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी सुराज्य विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी शालेय  शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, आयुक्त तुकाराम सुपे यांना ईमेलद्वारे केली होती. 

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आहे, इयत्ता आठवीचे काम ही प्रगतीपथावर आहे. दोन्ही निकाल लवकरच जाहीर केले जातील. तसेच पुढच्या वर्षीच्या परीक्षेचे वेळापत्रक शासनाच्या लाॅकडाऊन संदर्भातील सूचनांनुसार निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले असल्याचे एकाड यांनी सांगितले.

तसेच दरवर्षी या परीक्षेचा निकाल मे किंवा जून महिन्यात जाहीर होतो, पण यंदा ज्या एजन्सीला उत्तरपत्रिका तपासणीचे काम दिले त्यांनी स्कॅनिंगच्या कामाला उशीर केल्याने उशीर झाला आहे,असे एकाड यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.