पुणे : गेल्या वर्षभरापासून राज्यसेवा पूर्व परीक्षा वारंवार पुढे ढकलली जात असताना आता पुन्हा एकदा 14 मार्च रोजी होणारी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने पुढे ढकलून विद्यार्थ्यांना मोठा धक्का दिला आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. पुण्यातील नवी पेठ येथे विद्यार्थ्यांनी रास्ता रोको सुरु केले असून ठिय्या आंदोलन केले आहे.
एमपीएससीने गुरुवारी परिपत्रक काढून राज्यात कोणाचा प्रभाव वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आल्याने आता परीक्षा घेणे योग्य नाही असे पत्र पुनर्वसन विभागाने १० मार्चला एमपीएससीला दिले होते. त्यांच्या सूचनेनुसार ही परीक्षा पुढे ढकलली जात आहे असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे. दरम्यान वारंवार परिक्षा पुढे ढकलली जात असल्याने एमपीएसची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर नवी पेठे तील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले आहेत. नवी पेठेत मोठ्या वाहतूक कोंडी झाली असून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.