स्वारगेट : ''आयुष्य खूप मौल्यवान आहे. एखाद्या परीक्षेला आयुष्याची किंमत लावू देऊ नका. देशाला फक्त अधिकारी नाही तर वैज्ञानिक, व्यावसायिक, अभियंता, डॉक्टर, वकील, इत्यादी सर्व तज्ञांची गरज असते. स्पर्धापरीक्षा म्हणजे एकदम अज्ञातवासात जाणे. संगीत- सिनेमा, सर्व छंद बंद करणे, 2-4 वर्ष सर्व कार्यक्रमापासून दूर राहणे आणि अशा अनेक समजुतीने विद्यार्थी एकदम अलिप्त आणि एकटे पडून जातात. UPSC/MPSC या परीक्षा आहेत, विद्यार्थी दशेतील केवळ एक टप्पा आहे. आयुष्य या परीक्षेनंतर थांबत नाही आणि संघर्ष ही क्लासेस आणि इतरांना दोष देऊन आपण लांब नाही पळू शकणार कारण, शेवटी इंग्रजांच्या काळापासून तथाकथित सरकारी नोकरी म्हणजेच आयुष्याचं भल या मानसिकतेमध्ये आपण समाज म्हणून आज देखील आहोत आणि तिथेच या परीक्षेमागे असणाऱ्या वालयाचे मूळ आहे'' असे मत सकाळशी बोलताना सध्या आसाम राज्यातील कोकराझर जिल्ह्याचे एस .पी प्रतीक ठुबे यांनी मांडले.
गेल्या आठवड्यात स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने केलेल्या आत्महत्यामुळे राज्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणाईसमोरील प्रश्नांची चर्चा राज्यभर ढवळून निघाली . हजाराच्या आतमध्ये निघालेल्या पदासाठी यामध्ये लाखोंच्या संख्येने दरवर्षी परीक्षा देणारे विद्यार्थी, त्यामुळे वाढती बेरोजगारी, त्यातून येणारा आर्थिक ताण त्यातूनच तरुणांना येणारी निराशा आणि मग आत्महत्यासारखे टोकाचे उचलणारी पाऊल अश्या संकटात स्पर्धा परीक्षा विद्यार्थी सापडला आहे. परीक्षा अनियमित होणं, राज्य सरकारची नोकर कपात, रिक्त जागा लवकर न भरणे, नोकर भरतीमधील अपारदर्शकता, मागील ३ वर्षापासून जाहीरात निघून देखील परीक्षा होत नाहीत त्याच बरोबर विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना पर्यायी करियरसाठी बी प्लॅन विचार नसणे अश्या असंख्य कारणाने स्पर्धा परीक्षा विद्यार्थी वर्ग सैरभैर झाला आहे. यावर राज्य, देशभर अधिकारी वर्गाचा सकाळने घेतलेला आढावा
''आम्ही अधिकारी झालो म्हणजे व्यवस्थेचे सुप्रीम झालो असे होत नाही. हीही एक इतर नोकरीसारखी नोकरीच आहे. जास्त याचा बाऊ करण्याचं काही कारण नाही. अनेक जणांच्या म्हणण्यानुसार आम्हाला समाज सेवेसाठी अधिकारी होयच आहे. हे साफ खोटे आहे प्रत्येक अधिकारी समाजसेवा करतोच असे नाही. तुम्हाला कोणत्याही कामातून समाजसेवा करता येते. तुम्ही अधिकारी होण्याला विरोध नाही पण, दुसराही करियरचा मार्ग शोधून ठेवला पाहिजे.
- पर्वणी पाटील उपजिल्हाधिकारी (राज्यात मुलींमध्ये प्रथम 2019)
''तुम्ही स्पर्धा परीक्षा मधील तुमचे मुख्य ध्येय साठी पूर्ण वेळ तीन ते चार वर्षे दिली पाहिजे .त्यात निवड झाली नाही तर प्लॅन B शोधायला हवा व हे करत करत आपल्या मुख्य ध्येयाकडे प्रयत्न केले पाहिजेत. फक्त तुम्ही स्पर्धा परीक्षेत मला हेच पद मिळाले तरच स्वीकारेल असे म्हणून स्वतःला अनेक वर्षे गुंतवून पूर्णवेळ अभ्यास करीत असाल तर ते धोक्याचे ठरेल त्यामुळे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा. कोणाच्याही प्रचाराला बळी पडू नये.''
- आशिष बारकुल - उपजिल्हाधिकारी ( राज्यात प्रथम - 2019 )
''स्पर्धा परीक्षा हा जगण्यासाठी चा एक पर्याय आहे. एकमेव पर्याय नाही त्याकडे 'उप'जीविका म्हणून पाहणे आवश्यक आहे. जीविका म्हणून नाही 2-3 वर्षाची डेडलाईन ठरवावी. पर्यायी B तयार ठेवावा. स्पर्धा परीक्षा पास झालो नाही म्हणजे आयुष्य व आयुष्यातून मिळू शकणारा आनंद संपत नाही. याच्याही पलीकडे बऱ्याच पर्यायी संधी आहेत.''
- पूजा गायकवाड DYSP ( औरंगाबाद येथे कार्यरत )
''विद्यार्थ्यांनी वास्तवाचे भान ठेवून अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाचा सुरवातीचा काही काळ गांभीर्याने नाही घेतला तर पुढे यशस्वी होण्यास जास्त वेळ लागतो. 'प्लॅन बी'चाही अभ्यास करीत असताना नियोजन करावे. यश, अपयश जीवनाचा भाग आहे. त्याला खिलाडूवृत्तीने स्वीकारले पाहिजे.''
- डॉ. रणजित पाटील DYSP( कराड येथे कार्यरत )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.