लागोपाठ पेपरमुळे विद्यार्थी त्रस्त; कोरोनापासून दृष्टचक्र, एका दिवसाच्या गॅपची मागणी

म्हटलं एमएस्सीला तरी ही उणीव भरून काढता येईल. आता मी शेवटच्या सत्रात असून, आजही एकापाठोपाठ एक पेपरचे दुष्टचक्र संपलेले नाही.
students suffer due to back-to-back papers demand for one day gap education
students suffer due to back-to-back papers demand for one day gap educationSakal
Updated on

Pune News : ‘बीएस्सीची माझी पहिली दोन वर्षे लॉकडाऊनमध्ये गेली. शेवटच्या वर्षाला ऑफलाईन परीक्षा झाली, पण त्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. घाईत उरकलेला अभ्यासक्रम, तयारीसाठी अपुरा वेळ आणि ओव्हरलॅप होणाऱ्या पेपरमुळे परीक्षेत जेमतेम गुण मिळाले होते.

म्हटलं एमएस्सीला तरी ही उणीव भरून काढता येईल. आता मी शेवटच्या सत्रात असून, आजही एकापाठोपाठ एक पेपरचे दुष्टचक्र संपलेले नाही. निदान आता तरी विद्यापीठाने दोन पेपरमध्ये गॅप द्यायला हवी होती, अशी भावना एका विद्यार्थिनीने व्यक्त केली,’ जी प्रातिनिधीक म्हणावी लागेल.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. तीन वर्षांच्या प्रयत्नांनंतर परीक्षा वेळेवर पार पडत आहे. मात्र, पारंपारिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना अजूनही लागोपाठ पेपर द्यावे लागत आहेत. परिणामी विद्यार्थी अक्षरशः त्रस्त झाले आहेत. कोरोनामुळे आमच्या उच्च शिक्षणाचे नुकसान झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

राजेश (नाव बदलले आहे) म्हणतो, ‘‘आमच्या आधीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण झाल्यामुळे त्यांना नोकऱ्यांसाठी कोणीच विचारत नाही. आमच्या परीक्षा ऑफलाईन झाल्या, मात्र असंख्य अडचणींमुळे आम्हाला पाहिजे तेवढे गुण संपादित करता आले नाहीत.

या शेवटच्या सत्रात आम्हाला भरपाईची संधी होती. मात्र विद्यापीठाने एकापाठोपाठ एक पेपर ठेवले. त्यात बॅकलॉगचा एक पेपर सकाळी आणि नियमितचा पेपर दुपारी, अशी माझी अवस्था आहे. याचा परिणाम आमच्या गुणांवर होतो.’’

कोरोनामुळे विस्कळित परीक्षेचे वेळापत्रक झालेले होणे विद्यार्थी समजू शकतात. मात्र आता परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. आता तरी पेपरमध्ये किमान एक दिवसाची गॅप द्यायला हवी होती, अशी खंत विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.

विद्यार्थ्यांसाठी हे तोटे...

  • आधीच्या सत्रांत कमी गुणांमुळे शेवटच्या सत्रांत जास्त गुण संपादित करण्याची गरज

  • लागोपाठ पेपरमुळे अभ्यासाला पुरेसा वेळ नाही, पर्यायाने गुणांवर परिणाम

  • मानसिक ताणतणावांचा सामना करणे भाग

  • गुण वाढविण्याची शेवटच्या संधीतही अन्याय झाल्याची भावना

उपाय काय?

विद्यापीठाने पुढील परीक्षांचे नियोजन करताना विद्यार्थ्यांना दोन पेपरमध्ये निदान एक दिवसाची गॅप देणे आवश्यक आहे. बॅकलॉगचे विषय ओव्हरलॅप होणार नाहीत अशा पद्धतीने वेळापत्रक तयार करणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.