पुणे : पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना गावाकडे पाठविण्याची घोषणा झाली. पण आत्तापर्यंत केवळ एकच बस पुण्यातून बाहेर गेली आहे. हजारो विद्यार्थी अजूनही पुण्यात अडकून पडले आहेत. कोटा येथील विद्यार्थ्यांना मोफत महाराष्ट्रात आणले, पण पुण्यातून बाहेर जाणाऱ्यांकडून प्रवासासाठी पैसे मागितले जात असल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत.
लॉकडाऊन काळात पुण्यात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनी घरी जाण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली होती. विद्यार्थ्यांचे हाल सुरू असून, ते बिस्किट, मॅगी खाऊन दिवस काढत आहेत. जेवण पुरविणाऱ्या संस्थांची क्षमता संपली आहे. कोटातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात एसटी बसेसमधून आणण्यात आले. पण पुण्यातील विद्यार्थी गावाकडे जाऊ शकत नसल्याने हवालदिल झाले. यावरून टीकेची झोड उठल्याने राज्य शासनाने प्रशासनाला आदेश देऊन यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
गुरूवारी दुपारी १२ वाजता अहमदनगर येथील विद्यार्थ्यांची पहिली बस रवाना झाली. त्यानंतर नाशिक, नांदेड, जळगाव येथील विद्यार्थ्यांची बस जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर एकही विद्यार्थी पुण्याबाहेर पडू शकला नाही. शुक्रवारी दुपारपर्यंत एकही बस गेलेली नाही. राज्य सरकारने केवळ पोकळ घोषणा केली, पण प्रत्यक्षात यासाठी काहीच करण्यात आलेले नाही.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
एमपीएससी समन्वय समितीचे राहुल कवठेकर म्हणाले, 'पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांकडे जेवायला पैसे नाहीत आणि राज्य सरकार या विद्यार्थ्यांकडून तिकिटाचे पैसे घेत आहेत. कोटातील विद्यार्थ्यांना एसटीने मोफत आणले तर मग शेतकऱ्यांच्या मुलांकडून पैसे का घेतले जात आहेत. तसेच शासनाचे काहीच नियोजन नसल्याने पुण्यातून आतापर्यंत केवळ एकच बस बाहेर पडली आहे. इतर विद्यार्थी कधी जाणार, कसे जाणार हे स्पष्ट झालेले नाही.
समन्वय अधिकारी तहसीलदार विवेक जाधव म्हणाले, 'विद्यार्थ्यांना मोफत एसटी उपलब्ध करून देण्यासाठी अजूनपर्यंत शासनाने आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे आता विद्यार्थी किंवा संस्था तिकीटाचे पैसे भरत आहेत. नगरला गेलेल्या बससाठी संस्थेने पैसे भरले होते.
एनओसी मिळण्यास होतोय उशीर
पुणे रेडझोनमध्ये असल्याने येथील विद्यार्थ्यांना गावाकडे पाठविण्यापूर्वी संबंधित जिल्ह्यात त्यांची यादी पाठवली जाते. त्यांच्याकडून एलओसी आल्यानंतरच बस पुढे पाठवली जाते. ज्या विद्यार्थ्यांना गावाकडे जायचे आहे. त्यांनी विद्यार्थी संघटना संस्था, क्लासेस यांच्याशी संपर्क साधून अर्ज भरून द्यावा, असे जाधव यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.