आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांना मिळणार आकाश निरीक्षणाचे धडे

आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांना आता आकाश निरीक्षणाचे धडे गिरविण्याची एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.
sky observation lessons education
sky observation lessons educationsakal
Updated on
Summary

आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांना आता आकाश निरीक्षणाचे धडे गिरविण्याची एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.

पुणे - शहरातील विद्यार्थ्यांना (Students) ध्रुव तारा पुस्तकात (Book) वाचायला मिळतो. मात्र तो प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहताच येतो असे नाही. कारण शहरातील उंचच उच इमारती आणि प्रकाशाच्या प्रदूषणाने (Pollution) त्यांचे आकाश जणू झोकाळले गेले आहे. या उलट गाव-खेड्यावरच्या विद्यार्थ्याला रात्रीच्या वेळी जणू तारांगणच भेटायला येते. मात्र नक्की कोणती चांदणी कोणत्या नक्षत्रातली आहे. हेच त्याला अवगत होत नाही. अशाच आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांना आता आकाश निरीक्षणाचे (Sky Observation) धडे गिरविण्याची एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.

पुण्यातील श्वेता कुलकर्णी या तरुणीच्या ॲस्ट्रोनएरा (AstronEra) या संस्थेला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाकडून (आयएयू) महाराष्ट्रातील आदिवासी पाड्यांवर अवकाश निरीक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठी निधी मिळाला आहे. जगभरातल्या ९७ संस्थांमधून १७ संस्थाची इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनिअनच्या वतीने निवड करण्यात आली आहे. खगोलशास्राचा प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थाना इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनिअनद्वारे निधी देण्यात येतो. श्वेता म्हणाली,‘‘काही वर्षांपूर्वी दुर्बीण घेऊन मी पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागात गेले होते. प्रकाशाचे प्रदूषण नसल्यामुळे रात्रीचे आकाश अगदी ठळक दिसत होते. तेथील मुलांना मी दुर्बिणीद्वारे ग्रह, तारे आणि नेब्युला आदी अवकाशीय घटक दाखविले. रोजच दिसणाऱ्या रात्रीच्या आकाशातील चांदण्यांचे जणु गुपितच त्यांना उलगडले. इतक्या तन्मयतेने त्यांनी आकाश निरीक्षण केले. त्याचबरोबर दुर्बीण हाताळायची कशी, हे पण शिकून घेतले.’’ तिथूनच सुरू झालेला हा उपक्रम एका संस्थेत परिवर्तित झाला असून, त्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे.या प्रकल्पावर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली मिहीर आठले, सुशांत सुतरावे, अजय पेरके, ऐश्वर्या खाडे, श्रुती टोपकर, श्रेया जोशी यांच्या बरोबरीने १२ जणांची युवा टीम काम करणार आहे.

sky observation lessons education
पुण्यात सशस्त्र दल 'एएफएमसी'ची ७० वी व 'एएफएमआरसी'च्या ६० व्या बैठकीचे आयोजन

३० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण -

ॲस्ट्रोनएरा या संस्थेद्वारे राज्यातील आदिवासी भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांची चाचणीद्वारे निवड करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ३० विद्यार्थ्यांची निवड करत त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. त्यातील १५ विद्यार्थ्यांची गुणवत्तेच्या आधारे दुसऱ्या टप्प्यासाठी निवड करण्यात येईल. यामध्ये विद्यार्थ्यांना आकाश निरीक्षण, दुर्बीण हाताळणे, संभाषण आदींचे प्रशिक्षण देण्यात येईल.

विद्यार्थ्यांना केवळ शिकविणे हे आमचे ध्येय नाही. तर कौशल्यांच्या विकासाबरोबरच स्थानिक विद्यार्थ्यांना भविष्यात एक रोजगाराचे साधनही याद्वारे उपलब्ध होणार आहे. कारण आदिवासी पाड्यांवर प्रकाशाचे प्रदूषण नसल्यामुळे आकाश निरीक्षणासाठी एक आदर्श स्थिती आहे.

- श्वेता कुलकर्णी, संचालक, ॲस्ट्रोनएरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.