Educational Certificate : विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळणार शैक्षणिक प्रमाणपत्रे; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पोर्टल सुरू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आतापर्यंत शैक्षणिक प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागत होता.
University of Pune
University of Puneesakal
Updated on

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आतापर्यंत शैक्षणिक प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागत होता. या अर्जाची मुद्रित प्रत आवश्यक कागदपत्रांसह विद्यापीठाच्या विद्यार्थी सुविधा केंद्राकडे सादर करावी लागत होती.

या प्रक्रियेत बराच वेळ जात असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. विद्यार्थ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी विद्यापीठाने ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि कागदविरहित केली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना घरबसल्या शैक्षणिक प्रमाणपत्रे मिळू शकणार आहेत.

विद्यापीठाने कागदविरहित प्रक्रियेकडे पाऊल उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आता ऑनलाइन अर्ज भरून विद्यार्थ्यांना घरबसल्या शैक्षणिक प्रमाणपत्रे मिळणार आहेत. शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी ऑनलाइन पोर्टलचे उद्‌घाटन विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांच्या हस्ते नुकतेच झाले. विद्यापीठातील विद्यार्थी दरवर्षी मोठ्या प्रमाणात परदेशात उच्च शिक्षणासाठी जातात.

मात्र प्रवेश घेताना, तसेच पारपत्रासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना ट्रान्सक्रिप्ट प्रमाणपत्रासह इतर प्रमाणपत्रे अनिवार्य असतात. त्यात ट्रान्सक्रिप्ट प्रमाणपत्र, रँक प्रमाणपत्र, मीडियम प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र, दुय्यम शैक्षणिक प्रमाणपत्र यांचा समावेश आहे.

आतापर्यंत ही कागदपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून, त्याची मुद्रित प्रत आवश्यक कागदपत्रांसह विद्यापीठाच्या विद्यार्थी सुविधा केंद्राकडे सादर करावी लागत होती. मात्र, आता ही संपूर्ण प्रक्रिया पोर्टलद्वारे ऑनलाइन आणि कागदविरहित पद्धतीने राबविण्यात येणार आहे.

या अंतर्गत विद्यापीठाच्या संगणकीय प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर परीक्षा विभागाकडून त्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण केली जाईल आणि विद्यार्थ्यांना घरबसल्या ही प्रमाणपत्रे मिळतील. विशेष म्हणजे या प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यातील अपडेट मेसेज आणि ई-मेलद्वारे मिळणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्जाचा टप्पा तपासता येणार आहे. विद्यापीठाच्या एज्युटेक फाउंडेशनने निर्माण केलेल्या या पोर्टलचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केले आहे.

घरबसल्या शैक्षणिक प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी पोर्टल : https://sim.unipune.ac.in/sim_app/Login/Login

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.