10th Board Result : दहावी परीक्षेत उपनगरांतील विद्यार्थ्यांचे यश

दहावीच्या परीक्षेत पुणे शहर आणि उपनगरांतील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. याबद्दल शिक्षक आणि पालकांकडून या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
10th Board Result
10th Board Result sakal
Updated on

पुणे : दहावीच्या परीक्षेत पुणे शहर आणि उपनगरांतील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. याबद्दल शिक्षक आणि पालकांकडून या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

विद्येच्या प्रांगणात

सिल्व्हर क्रेस्ट स्कूल

इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत झील एज्युकेशन सोसायटीच्या सिल्व्हर क्रेस्ट स्कूलने चांगले यश संपादन केले आहे. शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून, परिक्षेस बसलेल्या ९१ विद्यार्थ्यांपैकी ७६ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह यश संपादन केले आहे. तर १५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश संपादन केले. दिव्यांशू गालुगडे याने ९६ टक्के मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. ९४.८० टक्के मिळवत आदिती नवघणे, दुर्गा यादव, कार्तिकेय देशपांडे या तिघांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर ९४.६ टक्के मिळवून अजिंक्य शिंगारे याने तृतीय क्रमांक मिळवला, अशी माहिती मुख्याध्यापिका अनुजा येरुडकर यांनी दिली.

सोनाई महाविद्यालय, फुरसुंगी

भेकराईनगर फुरसुंगी येथील सोनाई इंग्लिश मीडियम स्कूल आणि सायन्स ज्युनिअर महाविद्यालयाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ९९.५३ टक्के निकाल लागला आहे. ऋतुजा महेश विधाते हिने ९४.६० टक्के गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अनुश्री रसाळ व दृष्टी रोकडे हिने ९४.२० टक्के मिळविले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर दिशा ज्ञानेश्वर चिकणे हिला ९३.४० टक्के गुण मिळाले आहे, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता बनकर यांनी दिली आहे.

आपटे प्रशाला

आपटे प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. चारवी क्षीरसागर हिने ९३ टक्के मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर ९० टक्क्यांच्यावर पाच विद्यार्थी आले आहेत. १७ नंबरचा फॉर्म भरलेले दिव्यांग विद्यार्थ्यांचा देखील निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यात कुमार साठे ८०.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे प्रशालेच्या कर्णबधिर विभागाचा देखील निकाल शंभर टक्के लागला आहे.

लक्ष्मणराव आपटे प्रशालेतील नाईट स्कूल

लक्ष्मणराव आपटे प्रशालेतील नाईट स्कूलमधील दिव्यांग विद्यार्थ्यांमधील साहिल साठे याने ८०.४० टक्के गुण मिळवून माध्यमिक शालान्त परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच रुचिर वैद्य या विद्यार्थ्यांने ७८.४० टक्के मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे, अशी माहिती मुख्याध्यापिका मेधा सिन्नरकर यांनी दिली. शारीरिक उणिवेवर मात करत उण्यापुऱ्या ६ ते ८ महिन्याची धावपळ, मुलांच्या कलाने जात पालकांची धडपड यात दिसली. ज्युनिअर कॉलेज कॉमर्स विभागप्रमुख अमोल नेहेते, संतोष शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विश्वभारती स्कूल, धायरी

राज्य मंडळाच्या इयत्ता दहावीच्या निकालात धायरी येथील विश्वभारती इंग्लिश मीडियम स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला आहे. शिवराज नागनाथ सूर्यवंशी हा ९४.२० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आला आहे. तर प्रगती गायकर व रोहन गंधावले हे ८७.६० टक्के गुण मिळवून शाळेत द्वितीय व प्रतीक्षा कांबळे ८४.४० टक्के गुण मिळवून शाळेत तिसरी आली आहे. या परीक्षेत एकूण ५६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. परीक्षेत प्रविष्ट सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात विशेष प्रावीण्य श्रेणीत ४३ तर द्वितीय श्रेणीत १३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, अशी माहिती शाळेचे संस्थापक प्राचार्य डॉ. संजीव लाटे यांनी दिली.

महेश विद्यालय

महेश विद्यालय मराठी माध्यम शाळेतील दहावीचे १०० टक्के विद्यार्थी राज्य मंडळाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. शाळा समितीचे अध्यक्ष सचिन मंत्री, शाळेच्या मुख्याध्यापिका जान्हवी अजोतीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.