Success Story: बारामतीच्या सिध्दी घाडगेची गगनभरारी; मेहेनतीच्या जोरावर फ्लाईंग ऑफिसर म्हणून कार्यरत

The culmination of hard work and passion; Siddhi Ghadge's journey to the top in the Indian Air Force
siddhi gadghe baramati
siddhi gadghe baramati sakal
Updated on

Success Story: शालेय जीवनात उंच गगनभरारी घेण्याचे प्रत्येकच विद्यार्थ्यांचे स्वप्न असते, मात्र काही मोजकेच विद्यार्थी ख-या अर्थाने ही गगनभरारी घेऊ शकतात. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थीनी सिध्दी विकास घाडगे हिनेही भारयीत वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून कार्यरत होत ही गगनभरारी घेतली आहे.

सिध्दी घाडगे हिने AFCAT (एअर फोर्स कॉमन एंट्रन्स टेस्ट) व AFSB (एअर फोर्स सिलेक्शन बोर्ड) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या लेखी परीक्षा व मुलाखतीत चमकदार कामगिरी करून संपूर्ण भारतातून गुणवत्ता यादीत तिसरे स्थान मिळविले. (Air Force Common Entrance Test)

siddhi gadghe baramati
Sucess Story: कोण आहे भारतातला सर्वात तरुण अब्जाधीश? टॅक्सीच्या वाईट अनुभवानंतर उभारली करोडोंची कंपनी

सिद्धी ही विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मीडियम स्कूल (महाराष्ट्र बोर्ड) या शाळेची सन 2016-2017 या बॅचची इयत्ता दहावीची माजी विद्यार्थिनी आहे. शालेय जीवनात बालपणापासूनच तिने आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने सर्वांना प्रभावित केले होते. प्राथमिक व माध्यमिक विभागात उत्कृष्ट विद्यार्थिनी, सलग तीन वर्षे उत्कृष्ट मैदानी खेळाडू म्हणून शाळेतर्फे तिला गौरविण्यात आले होते.

बांबू उडी या क्रीडा प्रकारात तिने राष्ट्रीय पातळीवर व राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले होते. क्रीडा क्षेत्रात तिने मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेदरम्यान तिचा गौरव करण्यात आला होता.

siddhi gadghe baramati
Sucess Story : वरखेडेच्या सुपुत्राचा सातासमुद्रापार झेंडा

खेळाबरोबरच सिद्धीला वक्तृत्वाचीही फार आवड आहे. अभ्यासातील तिची प्रगती उल्लेखनीय होती. इयत्ता दहावीमध्ये तिने ९०.४०% गुण मिळवून विशेष प्राविण्य श्रेणी मिळविली होती. सिध्दीच्या यशात शाळेच्या प्राचार्या जॉयसी जोसेफ व शाळेतील शिक्षकांचा मोलाचा सहभाग असल्याचे तिच्या पालकांनी नमूद केले.

सिद्धीने मिळविलेल्या या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, संस्थेचे उपाध्यक्ष अँड. ए.व्ही.प्रभुणे, सचिव अँड.नीलिमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्त किरण गुजर, डॉ. राजीव शहा, मंदार सिकची व रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी तिचे व पालकांचे अभिनंदन केले.

siddhi gadghe baramati
Success Story: मनमाडचा शुभम जगताप सैन्यदलात लेफ्टनंटपदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.