नारायणगाव (पुणे) : नैसर्गिक बदलामूळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत खोडद येथील अल्पभूधारक असलेल्या मायलेकींनी चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर अपार कष्ट करून एक एकर बागेत पेरूची बाग फुलवली आहे.
या मायलेकींच्या जिद्दीची व कष्टाची परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. पन्नाशी पार केलेल्या या मायलेकींनी यशस्वी पेरू लागवडीतून 'हम भी कुछ कम नही' असा संदेश दिला आहे.
भाजप आमदाराच्या लग्नाला हजारोंची गर्दी; अन् सर्वसामान्यांना फक्त 50 जणांची मर्यादा
जयश्री पंढरीनाथ भोसले (वय ५५) व पार्वताबाई बन्सीलाल घंगाळे ( वय ७४) या मायलेकी खोडद येथे वास्तव्यास आहेत. त्यांना अडीच एकर बागायती शेती आहे. जयश्री भोसले यांचा मुलगा जयविजय हा नोकरी निमित्त बाहेरगावी असल्याने शेतीची सर्व जबाबदारी या मायलेकींवर आहे. जयश्री भोसले यांचे शिक्षण सातवी पर्यंत झाले आहे. युट्यूबच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे शेतीत विविध प्रयोग करण्याचा त्या प्रयत्न करतात. काही वेळेला शेतीत त्यांना अपयश येते. मात्र खचून न जाता पुन्हा नवीन जोमाने त्या शेतीच्या मशागतीत व्यस्त होतात.
शेतीच्या कामात त्यांना आई पार्वताबाई यांची खंबीर साथ आहे. अडीच एकर क्षेत्रापैकी एक एकर क्षेत्रात त्यांनी 'तैवान पिंक' या जातीच्या कलमी पेरूच्या रोपांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. जमीनीची मशागत करून चार ट्रॉली कुजलेले शेणखत, नत्र, स्फुरद, पालाश युक्त रासायनिक खतांचा बेसल डोस टाकून वाफे तयार करून पेरू लागवडीची पुर्व तयारी केली. पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक सिंचन व मल्चिंग पेपरचा वापर करून जुलै २०१९ मध्ये एक एकर क्षेत्रात एक हजार तीस पेरू रोपांची लागवड केली. गरजेनुसार जीवामृत, सेंद्रिय खत, मळी, कम्पोस्ट खताचा वापर केल्याने पेरूच्या रोपांची दीड वर्षात चांगली वाढ झाली आहे. रोपे, मशागत आदींसाठी एकरी २ लाख रुपयांचा भांडवली खर्च झाला आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो, निवडणुका ताकतीने लढवण्याची तयारी करा : वळसे-पाटील
सद्यस्थितीत पेरूची झाडे फळे व फुलांनी बहरली आहेत. पेरूची तोडणी सुरू झाली असून एक टन पेरूची विक्री स्थानिक व्यापाऱ्यांना प्रतवारीनुसार प्रति किलो ग्रॅम पन्नास ते साठ रुपये या दराने केली आहे.या हंगामात पेरूचे तेरा टन उत्पन्न निघेल. योग्य बाजारभाव मिळाल्यास भांडवली खर्च वजा जाता पहिल्याच तोडणी हंगामात किमान दीड ते दोन लाख रुपयांचा नफा होइल असा अंदाज जयश्री भोसले यांनी व्यक्त केला आहे.
''ध्यास घेतल्यास पुरुषांच्या मदती शिवाय शेती करता येते. ग्रामीण भागात महिलाच खऱ्या अर्थाने शेती करतात मात्र, त्यांच्या कष्टाकडे पुरूष प्रधान संस्कृतीमूळे दुर्लक्ष होत असते. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी शेती फायदेशीर होण्यासाठी बहुपीक शेती करावी. काळ्या आईची प्रामाणिक सेवा केल्यास घामाचे दाम मिळते.''
- जयश्री भोसले
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.