sugar mill
sugar millsakal media

तीन कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला

Published on

पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस गाळपाचे नियोजन
अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : साखर कारखान्यांचा गाळप हंगाम मागील दहा ते बारा दिवसांपासून सुरू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी असे एकूण जवळपास १८ साखर कारखाने सज्ज झाले आहेत. त्यापैकी तीन कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. चालू गळीत हंगामात १३८ लाख टन उसाचे गाळप करण्याचे नियोजन केले आहे, असे साखर कारखान्यांच्या सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यातील पूर्व, उत्तर भागात उसाचे दरवर्षी उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी उशिराने झालेल्या पावसामुळे जवळपास सव्वा लाख हेक्टरवर उसाच्या लागवडी झाल्याचा अंदाज आहे. त्यापैकी यंदा गाळपासाठी सुमारे सव्वा लाख हेक्टरवरील ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. चालू वर्षी उसाचे सुमारे १३८ लाख टन उसाचे गाळप होण्याचे अपेक्षित आहे. त्यातून १४३ लाख मेट्रिक टनांहून अधिक साखर उत्पादन होईल, असा अंदाज आहे.

जिल्ह्यात जवळपास १८ साखर कारखाने आहेत. त्यापैकी १६ कारखाने गाळपासाठी पुढाकार घेतील. शासनाने १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १६ ऑक्टोबरपासून आतापर्यंत तीन कारखाने सुरू झाले आहे. यामध्ये सहकारी दोन व खासगी एक साखर कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता ९४,७५० टन एवढी आहे. आतापर्यंत ८१ हजार ६३० टनाचे गाळप केले. त्याद्वारे ४२ हजार ५५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर साखर उतारा ५.२१ टक्के एवढा आहे. त्यासाठी लागणारे तोडणी मजूर कारखाना स्थळावर उशिराने दाखल होत असल्याचे चित्र आहे. यंदाच्या गाळप हंगामात ऊसतोडणीसाठी तोडणी मजुरांऐवजी, ऊसतोडणी यंत्राचा वापर होणार असल्याची शक्यता आहे.
.............
परवाने ऑनलाइन मिळणार
साखर कारखानदारांनी प्रातिनिधिक स्वरूपात गव्हाणीत उसाची मोळी टाकून हंगाम सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. परंतु प्रत्यक्षात
कारखान्यांना साखर आयुक्त स्तरावरून अधिकृत परवाने दिल्यानंतर कारखाने सुरू होत आहेत. परवाने ऑनलाइन देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत कारखान्यांना ऑनलाइन परवाने दिल्यानंतर पुणे जिल्ह्यातील बहुतांशी सर्व साखर कारखाने दिवाळीपूर्वी, दिवाळीनंतर सुरू होण्याचा अंदाज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()