Suhana Sakal Swasthyam 2023 : स्वास्थ्यजागराची नांदी; महोत्सवाला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद

सूर्य मावळतीकडे झुकत होता. त्याचवेळी डी. पी. रस्त्यावरील पंडित फार्म्समध्ये सकारात्मक ऊर्जेचा होम प्रज्वलित होत होता.
Suhana Sakal Swasthyam 2023 event
Suhana Sakal Swasthyam 2023 eventsakal
Updated on

पुणे - सूर्य मावळतीकडे झुकत होता. त्याचवेळी डी. पी. रस्त्यावरील पंडित फार्म्समध्ये सकारात्मक ऊर्जेचा होम प्रज्वलित होत होता. मंत्रोच्चार करत दिलेल्या पवित्र आहुत्यांमधून ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ची शुक्रवारी मंगलमय वातावरणात सुरुवात झाली.

हवेमध्ये दरवळणारा उदबत्यांचा मंद सुगंध, सुवासिक फुलांच्या आकर्षक रांगोळ्या, प्रत्येकाचे मन प्रफुल्लित करणारा धूप, यातून निर्माण झालेल्या प्रसन्न वातावरणात आत्मभान जागविणाऱ्या आणि अलौकिक आत्मिक आनंद देणाऱ्या सोहळ्याच्या एका नव्या पर्वाची नांदी झाली.

‘स्वास्थ्यम्’ आरोग्य महोत्सव आहे. सलग दुसऱ्या वर्षी होणाऱ्या महोत्सवाला पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या तासभरआधीच श्रोते आसनस्थ झाले होते. बरोबर पाच वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. आध्यात्मिक व योग गुरू श्री एम यांचे व्यासपीठावर आगमन होताच संपूर्ण प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

त्यांच्या पाठोपाठ ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, संचालक मृणाल पवार, विश्व फाउंडेशनचे प्रमुख पुरुषोत्तम राजिमवाले महाराज आणि प्र-कुलगुरू डॉ. विश्वजित कदम व्यासपीठावर उपस्थित होते.

या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘सुहाना मसाले’, तर पॉवर्ड बाय प्रायोजक ‘भारती विद्यापीठ’, फायनान्शियल हेल्थ पार्टनर ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी ली.’ (मल्टिस्टेट), ऊर्जा पार्टनर ‘निरामय वेलनेस सेंटर’, हेल्थ पार्टनर ‘शारंगधर नॅचरल हेल्थ केअर’ आहेत.

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे विभागीय प्रमुख सुशिल जाधव, निरामय वेलनेस सेंटरचे संचालक डॉ. अमृता आणि डॉ. योगेश चांदोरकर यांचा सत्कार श्री एम यांच्या हस्ते करण्यात आला. शारंगधर नॅचरल हेल्थ केअरचे जयंत अभ्यंकर, भारत फोर्ज लिमिटेडचे अमित कल्याणी, चंदुकाका सराफ अँड सन्सचे सिद्धार्थ शहा, फिनोलेक्स केबलचे अमित माथूर, अॅथरचे निहार अहिरे यांचे सहकार्य मिळाले.

प्रास्ताविक करताना अभिजित पवार म्हणाले, ‘स्वास्थ्यम हा तीन दिवसांचा एक उत्सव आहे. त्याला गेल्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. या दुसऱ्या पर्वाचाही नागरिकांना निश्चित लाभ होईल, असा विश्वास आहे. संतुलीत जीवन जगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. भौतिक आणि आध्यात्मिक हे दोन्हीही समांतर असेल, अशा व्यवस्थेची गरज आहे. त्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहोत.

‘स्वास्थ्यम्’ हे फक्त ऐकण्यासाठी नाही, तर तुम्ही ते आचरणात आणावे. त्यातून नक्की सकारात्मक ऊर्जा मिळते, त्याची अनुभूती तुम्हाला येथे येईल. संतुलित जीवन जगण्यासाठी उपनिषदांच्या अभ्यासाची सुरुवात केली पाहिजे. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमात त्याचा समावेश करण्याची गरज आहे.’’

‘स्वास्थ्यम्’बरोबर कायम राहणार : डॉ. कदम

‘मानसिक, शारीरिक आरोग्याबाबत लोकांना योग्य मार्गदर्शन हवे आहे. ते अधिकृत मार्गदर्शन ‘स्वास्थ्यम्’ या उपक्रमातून मिळते. कोरोना उद्रेकानंतर आरोग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे भारती विद्यापीठ ‘सकाळ’च्या स्वास्थ्यम् उपक्रमाबरोबर पुढेही निश्चित सोबत राहू.

कारण, शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत सर्वच वयोगटात जागृती होत आहे. अशावेळी नवीन विज्ञान आणि पारंपरिक ज्ञान यांची सांगड घातली पाहिजे. त्यासाठी हे व्यासपीठ आवश्यक आहे,’ असे डॉ. विश्‍वजित कदम म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.