छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या; तिघांजणावर गुन्हा दाखल

गावातील टिंगल टवाळी करणाऱ्या मुलांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून बोरी (ता. इंदापूर) येथील १५ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थीनींने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली.
suicide
suicidesakal
Updated on
Summary

गावातील टिंगल टवाळी करणाऱ्या मुलांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून बोरी (ता. इंदापूर) येथील १५ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थीनींने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली.

वालचंदनगर - गावातील टिंगल टवाळी करणाऱ्या मुलांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून बोरी (ता. इंदापूर) येथील १५ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थीनींने (Minor Girl) गळफास (Hanging) घेवून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांजणावर आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा (Crime) दाखल केला असून दोघांना अटक केली.

याप्रकरणी पोलिसांनी गणेश उर्फ जी. के. संतोष कुचेकर (वय २४), यश अरुण गरगडे (वय १८, रा. दोघे बोरी) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. तिघांपैकी एक जण अल्पवयीन आहे. या घटनेमध्ये सिद्धी गजानन भिटे (वय १५) या विद्यार्थीनींने घरामध्ये साडीच्या साहय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी मुलीचे वडिल गजानन पांडुरंग भिटे (वय ४२) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सिद्धी गावातील हायस्कुलमध्ये इयत्ता ९ वी मध्ये शिकत होती. शाळेमध्ये ये-जा करीत असताना गावातील तिघे जण टिंगल टवाळ करुन सिद्धीची छेड काढून तिला नाहक त्रास देत होते.

suicide
पुणे : कर गोळा करणारे कर्मचारीच बिनपगारी

सिद्धीने या घटनेचे घरी माहिती दिल्यानंतर सिद्धीच्या वडिल गजानन यांनी तिघांच्या घरी जावून त्यांच्या आई-वडिलांना छेडछाड बद्दल माहिती यापूर्वी अनेकवेळा कल्पनाही दिली होती. छेडछाडीचा प्रकार थांबला नसल्याने बुधवार (ता. १२) रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सिद्धीने घरातील पत्र्याच्या लोखंडी अॅगल ला साडीच्या साहय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्यापूर्वी तिने चिठ्ठी लिहिली होती. याप्रकरणी पोलिसांनी तिघांजणावर आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन लकडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.