रो हाऊससाठी गुंतवणूक केलेले पैसे परत न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

लोहगाव येथे गणेशने रो हाऊससाठी पैसे गुंतविले होते, ते पैसे गेली अनेक वर्षे परत न मिळाल्याने त्याने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप केला.
 तरुणाची आत्महत्या
तरुणाची आत्महत्याsakal
Updated on

विश्रांतवाडी : येरवडा येथील तरुण कॅटरिंग व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश लाड (वय ३२) असे या आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे. लोहगाव येथे गणेशने रो हाऊससाठी पैसे गुंतविले होते, ते पैसे गेली अनेक वर्षे परत न मिळाल्याने त्याने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप केला. (Pune News)

त्यामुळे येरवडा पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने नातेवाईक जमा झाले होते. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी व नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी, गणेश लाड हा येरवडा भागात कॅटेरिंगचा व्यवसाय करत होता. तो शिव वाहतूक संघटनेचा पदाधिकारीदेखील होता. त्याने लोहगाव येथे रो हाऊससाठी एका डेव्हलपर्सकडे पैसे गुंतवणूक केले होते. मात्र डेव्हलपर्सकडून रो हाऊस किंवा पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे तो तणावात होता. या तणावातून त्याने बुधवारी सायंकाळी येरवड्यात गळफास लावून आत्महत्या केली.

 तरुणाची आत्महत्या
'देशात पॉर्न पाहण्याचं कारणं सनी लिओनी, तिच्यावर कारवाई का नाही?'

त्यानंतर लोहगाव येथील डेव्हलपर्सवर गुन्हा दाखल करावा यासाठी त्याची पत्नी व नातेवाईक येरवडा पोलीस ठाण्यात आले होते. त्यानंतर नातेवाईक व डेव्हलपर्स यांच्यात झालेल्या चर्चेतून पैसे परत देण्याचे डेव्हलपर्स यांनी मान्य केले. त्यामुळे नातेवाईकांनी कोणतीही तक्रार दिली नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख म्हणाले, लाड कुटुबीय व डेव्हलपर्स यांच्यात पोलीस स्टेशनबाहेर समझोता झाला. त्यामुळे लाड कुटुंबियांनी तक्रार दिली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()