पुणे - ‘संडे सायन्स स्कूल’ (Sunday Science School) व ‘सकाळ माध्यम समूह’ (Sakal media Group) गेली १० वर्षे शालेय विद्यार्थ्यांसाठी (School Student) प्रयोग साहित्याच्या संचांमधून विविध प्रयोग स्वतः करून विज्ञान शिकण्याचा अनोखा उपक्रम राबवत आहेत. जवळपास सहा महिने रविवारी चालणारा हा उपक्रम मुलांना तर आवडतोच, याशिवाय प्रत्यक्ष हाताने प्रयोग करण्याची संधी मिळत असल्याने त्यांच्या वैज्ञानिक संकल्पना अधिक स्पष्ट होतात. (Sunday Science School Student Scientist Undertaking)
इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २२ ते २५ आठवड्यांचा व पहिली व दुसरीच्या मुलांसाठी १५ आठवड्यांचा हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदा ४ जुलै २०२१ पासून सुरू होणार आहे. यामध्ये वयाप्रमाणे वेगवेगळ्या लेव्हल्ससाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. दर रविवारी पाठवलेल्या व्हिडिओच्या मदतीने विज्ञान विषयातील विविध संकल्पना समजून घेऊन त्यावर आधारित प्रयोग किंवा सायन्स मॉडेल्स विद्यार्थी स्वत: बनवतील व ऑनलाइन मीटिंगच्या मदतीने विषय समजावून घेतील. व्हिडिओ व ऑनलाइन मीटिंग्स इंग्रजी भाषेतून असतील. सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान अभ्यासक्रमावर आधारित ॲनिमेशनचा वापर असलेले इंग्रजी भाषेतील ई-पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिले जाणार आहे. हा उपक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र दिले जाईल.
घरपोच मिळणारे प्रयोगाचे सर्व साहित्य, नोट्स, त्यावरील व्हिडिओज, ऑनलाइन मीटिंग्स, ई-पाठ्यपुस्तक असे सर्व काही या उपक्रमात असून या कोर्सेसची फी माफक ठेवलेली आहे व दोन हप्त्यांमध्ये भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
प्रयोगातून विज्ञान शिक्षण उपक्रम
उपक्रमाची सुरुवात - ४ जुलै २०२१
प्रवेश घेण्यासाठी अंतिम मुदत - ३० जून २०२१
प्रयोग साहित्य घरपोच मिळणार
दर्जेदार डिजिटल व्हिडिओ व दर रविवारी लाइव्ह क्लास
शुल्क : विविध लेव्हल्ससाठी ३१०० ते ७२०० रुपये (सर्वसमावेशक)
अधिक माहितीसाठी - ९३७३०३५३६९/ ९६०७२०८५५२/ ८७७९६७८७०९ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा वरील कुठल्याही क्रमांकावर विद्यार्थ्याचे नाव व इयत्ता लिहून व्हॉट्सॲप मेसेज पाठवावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.