मुंबई- बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी पुत्र जय पवार यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकाच चर्चेला सुरुवात झाली आहे. कार्यकर्त्यांची मागणी असेल तर जय पवारांना संधी देण्याचा विचार होऊ शकतो, असं अजित पवार म्हणालेत. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी लढणार नाही असं वक्तव्य दादांनी केलं नाही. विनाकारण दादांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. विधानसभेच्या निवडणुका महायुतीत राष्ट्रवादी पक्ष अजित दादांच्या नेतृत्वात लढणार आहे. पक्षाला यश अधिक कसे मिळवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. दादा नेमकं कुठल्या उद्देशाने म्हणाले ते दादांशी चर्चा करून तुम्हाला कळवीन, असं तटकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.