"SC-STच्या संविधानिक आरक्षणाला पाठिंबा पण इतर आरक्षणं..."; RSSनं स्पष्ट केली भूमिका

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून गेल्या पंधरादिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे.
Mohan Bhagvat
Mohan Bhagvate sakal
Updated on

नवी दिल्ली : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून गेल्या पंधरादिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यातच ओबीसी समाजानं मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षणाला विरोध करत आंदोलन सुरु केलं आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या सामाजिक आरक्षणांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Support for constitutional reservation of SC ST other reservations are Political only RSS clear its stand)

SC-ST ना वंचित ठेवलं

संघाचे सचिव मनमोहन वैद्य यांनी पुण्यातील बैठकीदरम्यान बोलताना संघाची आरक्षणविषयक भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "अनुसुचित जाती आणि जमाती अर्थात शेड्युल कास्ट, शेड्युल ट्राइब्ज या आमच्या समाजातील वर्गाला आमच्या बांधवांना आमच्याच समाजानं सन्मानापासून, सुविधांपासून आणि शिक्षणापासून दुर्देवानं अनेक वर्षांपासून वंचित ठेवलं आहे. त्यांना सोबत घेण्यासाठी जे संविधानानं दिलेलं आरक्षण आहे, ते त्यांना मिळायला हवं. (Latest Marathi News)

Mohan Bhagvat
Project Cheetah 2: आता दुसरा टप्पा! भारतात पुन्हा परदेशातून येणार चित्ते, सरकारी अधिकाऱ्यांची माहिती

इतर आरक्षण राजकीय

याद्वारे सामाजिक विषमतेला लवकरात लवकर दूर करायला पाहिजे, ही संघाची कायमच भूमिका राहिली आहे. पण बाकीच्या सर्व आरक्षणांची मागणी ही राजकीय असते. त्यामुळं त्याबाबत इथं कुठलंही चर्चा होत नाही" (Marathi Tajya Batmya)

Mohan Bhagvat
One Nation, One Election: 'एक देश, एक निवडणूक'साठी हालचालींना वेग; 'या' दिवशी होणार समितीची पहिली बैठक

मराठा आरक्षणासाठी उपोषण

मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे दाखले देण्यात यावेत. या दाखल्यांद्वारे त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसह मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते नांदेड इथं उपोषणाला बसले होते. १७ दिवस चाललेल्या या उपोषणानंतर सरकारनं ठोस आश्वासनं दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण सोडलं.

Mohan Bhagvat
Cabinet Meeting: गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या विषयांचं काय झालं? विरोधकांच्या प्रश्नाला फडणवीसांचं सविस्तर उत्तर

ओबीसी समाज आक्रमक

जरांगेंना आरक्षणाचं आश्वासन सरकारनं दिल्यानंतर आता मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी समाजानं आक्षेप घेतला आहे. त्यामुळं आता ओबीसी आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. नागपूरमध्ये ओबीसी समाजानं चार पाच दिवसांपासून आंदोलन सुरु केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.