Pune : भुक भागविण्यासाठी आदिवासी कातकरी कुटुंबाला रानमेव्याचा आधार

करवंदाचं ओझं घेऊन लवासा ते खडकवासला प्रवास; पर्यटकांचीही उत्स्फूर्त खरेदी
Support of fruits to tribal family to satisfy hunger tourists make spontaneous purchases
Support of fruits to tribal family to satisfy hunger tourists make spontaneous purchasessakal
Updated on

सिंहगड : करवंदाने भरलेलं कॅरेट डोक्यावर घेऊन एक तरुण खडकवासला धरण चौकाकडून चौपाटीकडे भरभर चालत होता. त्याच्यामागे काही अंतरावर एक महिला व आणखी एक तरुण पेपरची रद्दी, लहान-मोठ्या पिशव्या, मापासाठी ग्लास आणि पाण्याची बाटली ठेवलेले कॅरेट घेऊन चालत येत होते. चालून-चालून थकल्याने पुढे असलेल्या तरुणाने सावलीला डोक्यावरील ओझं टेकवलं आणि मागून येणाऱ्या सहकाऱ्यांची वाट पाहत थोडा वेळ बसला.

रविवार असला तरी खडकवासला धरण चौपाटी परिसरात पाण्यात उतरण्यास प्रशासनाने बंदी घातल्याने नेहमीसारखी पर्यटकांची वर्दळ दिसत नव्हती. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तरुणासमोरील कॅरेटमधील रसरशीत करवंदे पाहून पर्यटकांची पावले त्याच्याकडे वळली. 'कसे दिले करवंदे?' असे एका पर्यटक महिलेने विचारल्यावर, 'वीस रुपयाला ग्लास भरुन आहेत; पण थांबा थोडं पेपर आणि ग्लास घेऊन मागून आमची माणसं येत आहेत!' असं म्हणून त्याने चालत येणाऱ्या दोघांना लवकर येण्यासाठी हाक मारली.

Support of fruits to tribal family to satisfy hunger tourists make spontaneous purchases
Pune Accident : सिंहगड घाटात दुचाकी घसरली; पती पत्नी जखमी

मागे असलेले दोघे आल्यानंतर त्यांनी करवंदाचे माप द्यायला सुरुवात केली. कोणी पाच,कोणी दोन, कोणी एक ग्लास चे माप घेऊन पैसे देऊन जात होते.संजय मोरे, प्रकाश आणि गौरी जाधव हे आदिवासी कातकरी समाजातील तिघेजण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काही पैसे मिळतील म्हणून लवासा सिटी जवळील मुळशी तालुक्यातील पाथरशेत या सह्याद्रीच्या कुशीतील गावातून खडकवासला येथे करवंदे विकण्यासाठी आले होते. आल्याआल्याच करवंदाला चांगले गिऱ्हाईक मिळाल्याने तीघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत होता !

पोलीसांकडे बघण्याचा दृष्टीकोन का खालावलाय?.......... खडकवासला धरण चौपाटी परिसरात काही पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यातील एकाने करवंदे कसे दिलेत असे विचारल्यानंतर तो आदिवासी तरुण थोडावेळ काहीच बोलला नाही. पोलीसाने पुन्हा विचारले 'करवंद कसे दिलेत, अरे मी विकत घेणार आहे!' करवंद विकत घेणार आहे असे बोलल्यानंतर तो तरुण वीस रुपयाला एक ग्लास आहे असे म्हणाला.

Support of fruits to tribal family to satisfy hunger tourists make spontaneous purchases
Pune : कबुतरांच्या स्पर्धेला राष्ट्रीय खेळाची ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न; अली दारूवाला

मात्र आपण काट्यात जाऊन तोडून एवढ्या लांब डोक्यावर ओझं आणलेले करवंदे पोलीस फुकट तर घेणार नाहीत ना? ही चिंता काहीवेळ त्या तरुणाच्या चेहऱ्यावर दिसली होती. दोन्ही पोलीसांनी प्रत्येकी शंभर रुपये देऊन पाच-पाच ग्लास करवंदे घेतले. अगदी सामान्यातील सामान्य व दूर डोंगरात जीवन जगणाऱ्या आदिवासी कातकरी नागरिकांमध्येही पोलीसांकडे पाहण्याचा दृष्टीकोन किती खालावलेला आहे ही गोष्ट नक्कीच पोलीसांना विचार करण्यास भाग पाडणारी आहे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.