वालचंदनगर : हर्षवर्धन भाऊंना (हर्षवर्धन पाटील) शिव्या घातल्या तर गाठ माझ्याशी (सुप्रिया सुळे) आहे. धमकी देणाऱ्यांना सत्ता व पैशाची मस्ती असून जैसे चढा सकते है... वैसे उतार भी सकते है...
असल्याचे सांगून धमकी दिली मी तुमची ढाल म्हणून उभी राहणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी ठकावून सांगून तालुक्यामध्ये दमदाटी व शिवीगाळ करणाऱ्यांना चपराक दिली. वालचंदनगर (ता.इंदापूर) येथे राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक मेळाव्यामध्ये बोलत होते.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने,कामगार नेते शिवाजी खटकाळे, तालुकाध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील,कार्याध्यक्ष महारुद्र पाटील,ज्येष्ठ नेते अशोक घोगरे, सागर मिसाळ,अमोल भिसे, छाया पडसळकर,युवकचे तालुकाध्यक्ष अनिकेत निंबाळकर,गणेश धांडोरे उपस्थित होते.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितले की,एक मित्र पक्ष दुसऱ्या मित्र पक्षाच्या नेत्याला (हर्षवर्धन पाटील) शिव्या घालतो. ही इंदापूरची, महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? हर्षवर्धन भाऊंनी शिवीगाळ केल्याचे पत्र मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांना पत्र दिले आहे.
यापुढे बारामती व लोकसभा मतदार संघामध्ये दमदाटी चालणार नाही.तुम्हाला कोणी धमकी दिली तर माझा मोबाईल नंबर द्या. मी तुमची ढाल म्हणून तुमच्या पाठीशी उभी राहील असे सांगून आम्ही दडपशाहीला घाबरणार नसून ही धमकी,दमदाटीची भाषा महाराष्ट्रात चालणार नाही असे ठणकावून सांगितले.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, २०१४ च्या निवडणूकीमध्ये न खाऊंगा न खाणे दुंगाचा भाजपने नारा देवून भष्ट्राचार मुक्त भारत करण्याचा नारा दिला होता.मात्र काही दिवसापूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन खासदार झाले.
खासदार होण्यापूर्वी आठ दिवसापूर्वी भाजपचे नेत्यांनी अशोक चव्हाण यांच्यावरती भष्ट्राचाराचे (आदर्श घोटळा) आरोप करीत होते. आठ दिवसामध्ये त्यांचा भाजप प्रवेश करुन त्यांना खासदार केले.
अशोक चव्हाण यांनी भष्ट्राचार केला असेल तर,भष्ट्राचार मुक्त भारताचे काय झाले ? भष्ट्राचार केला नसेल आणी भाजपने केलेले आरोप खोटे असतील तर भाजपने अशाेक चव्हाण व कॉग्रेस पक्षाची माफी मागावी अशी मागणी करुन भाजप हा पक्ष भष्ट्र जुमला पार्टी असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
शेतकऱ्यांच्या मुलांनी पन्नास टक्के शेती व पन्नास टक्के नोकरी करावी हा उद्देश डोळ्यासमाेर ठेवून बारामती लोकसभा मतदार संघासह महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी एमआयडीसीमध्ये
कंपन्या आणल्या. बारामतीमध्ये रोजगार मेळाव्यामध्ये आलेल्या सर्व कंपन्यांची उद्घघाटने पवार साहेबांनी केली असल्याचे सांगितले. या मेळाव्यासाठी उभारलेल्या मंडपाचे एक दिवसाचे भाडे ५ कोटी रुपये असल्याचे सांगितले.
पालकमंत्री बदलण्यासाठी दिल्लीवारी केली जात असेल तर शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा, अंगणवाडी, आशा सेविकांचे मानधन वाढवावे यासाठी दिल्ली वारी का केली जात अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
भाजपवाले सारखे ७० वर्षामध्ये काय केले असे विचार आहेत. ७० वर्षात सर्व कामे झाली आहे. जनतेला रोटी,कपडा,मकान,गटर,वॉटर,मीटर,वीज, पाणी सगळे दिले. साखर कारखाने,बॅक काढल्या. तुम्ही १० वर्षात काय केले याचा हिशोब द्या असे सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.