‘पीएमआरडीए’च्या हरकती मार्गी लावणार ; सुप्रिया सुळे

‘पीएमआरडीए’च्या प्रारूप विकास योजनेविषयी नागरिकांच्या हरकतीबाबत पिरंगुट (ता. मुळशी) येथील सभेत मार्गदर्शन करताना सुळे बोलत होत्या.
सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळेsakal
Updated on

मुळशी: ‘‘भोर, वेल्हे, मुळशीची स्वतंत्र सभा घेऊन येत्या पंधरा दिवसांत ‘पीएमआरडीए’च्या हरकतींबाबतचे प्रश्न मार्गी लावू. गणेशोत्सवापूर्वी पहिली सभा आणि नंतर दुसरी सभा बोलावून ही समस्या मार्गी लावू. ‘पीएमआरडीए’ ही ग्रामीण भागासाठी आणि आपल्यासाठी आहे. इथली लोकसंख्या विचारात घेऊन झोनिंगचा विचार झाला पाहिजे. त्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालणार आहे,’’ अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

‘पीएमआरडीए’च्या प्रारूप विकास योजनेविषयी नागरिकांच्या हरकतीबाबत पिरंगुट (ता. मुळशी) येथील सभेत मार्गदर्शन करताना सुळे बोलत होत्या. या वेळी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाच लाख रुपये निधीतून येथील अंतर्गत रस्त्याचे भूमीपूजनही सुळे यांच्या हस्ते झाले. या वेळी राजेंद्र हगवणे, सविता दगडे, महादेव कोंढरे, सुनील चांदेरे, अमित कंधारे उपस्थित होते.

सुप्रिया सुळे
पुणे-सोलापूर रस्त्यावर ‘एसटी’वर दगडफेक

या आहेत प्रमुख मागण्या

पिरंगुटची लोकसंख्या विचारात घेता दीड किलोमीटरचा रेडिअस मिळाला पाहिजे. त्यामुळे येथील सांडपाणी प्रकल्प, घनकचरा प्रकल्प व अन्य प्रलंबित विकासकामे मार्गी लावता येईल. सरपंच चांगदेव पवळे म्हणाले, ‘‘पिरंगुटचा पूर्वीप्रमाणेच जसा होता, तसाच झोन ठेवावा.’’ उपसरपंच राहुल पवळे म्हणाले.

सुप्रिया सुळे
रुपीच्या प्रशासकांकडून रिझर्व्ह बॅंकेला तीन पर्यायांचा प्रस्ताव

‘‘गावठाणालगत दीड किलोमीटरपर्यंत निवासी झोन व्हावा.’’ मुकाईवाडी येथील नव्याने आरक्षित केलेला कचरा प्रकल्पसाठीचे आरक्षण रद्द व्हावे. शिवकालीन तुळजा भवानी टेकडीलगतचे महाविद्यालयाबाबतचे आरक्षण रद्द व्हावे, आदी मागण्या महादेव कोंढरे यांनी सादर केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.