पुणे - गुरुवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला होता, अशा मुसळधार पावसातच पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राजकीय पक्षांचे हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते शनिवारी मूक आंदोलनास बसले होते. खुद्द शरद पवार यांच्यासारखे वरिष्ठ नेतेही भर पावसातील या मूक आंदोलनाला उपस्थित होते.
त्याचवेळी कार्यकर्त्यांसमवेत बसलेल्या खासदार सुप्रिया सुळे उठल्या. डोक्यावर पदर घेत, मुसळधार पावसात भिजत त्या बोलू लागल्या, तितक्याच पोटतिडकीने महिला अत्याचाराविरुद्ध उपस्थितांशी संवाद साधत राहिल्या !