सुरेश पिंगळे आत्महत्या प्रकरणी महिला पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन

सुरेश पिंगळे आत्महत्या प्रकरणी महिला पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन
Updated on

पुणे : चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब झाल्याने पोलिस आयुक्तालयासमोरील आत्महत्या प्रकरणात एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश परिमंडळ चारच्या पोलिस उपायुक्तनी शुक्रवारी रात्री काढला.

सुरेश पिंगळे आत्महत्या प्रकरणी महिला पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन
आंबिल ओढा झोपडपट्टीवरील कारवाईची स्थगिती उठवली

विद्या पोखरकर असे निलंबन केलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सुरेश पिंगळे आत्महत्या केलेल्या व्यक्तिचे नाव आहे. नोकरीसाठी लागणारे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी पोलिस आयुक्तालयात फेऱ्या मारणाऱ्या पिंगळे यांनी बुधवारी पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेतले. उपचार सुरू असतानाच गुरुवारी सायंकाळी त्यांचा एका खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी गुरुवारी रात्री त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर शुक्रवारी पहाटे मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

सुरेश पिंगळे आत्महत्या प्रकरणी महिला पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन
पुणे : सुपर स्प्रेडर सर्वेक्षणामुळे हॉटस्पाट गावांमध्ये घट

संबंधित प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर आरोप केल्यानंतर पुणे पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टिका झाली होती. दरम्यान, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते, त्यानंतर रात्री निलंबनाचा आदेश काढण्यात आला.पोखरकर या खडकी पोलिस ठाण्यात चारित्र्य पडताळणी विभागात काम करतात. पिंगळे यांचा अर्ज पोलिस ठाण्याकडे आल्यानंतर त्यांनी कर्तव्यकसूरीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवून त्यांचे निलंबन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.