Aundh Fire Accident : सूसगाव येथे आगीत वीस घरे जळून खाक

सूसगाव येथील बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांच्या वसाहतीत कुलूपबंद घरात आग लागल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजता घडली.
Aundh Fire Accident
Aundh Fire AccidentSakal
Updated on

औंध : सूसगाव येथील बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांच्या वसाहतीत कुलूपबंद घरात आग लागल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजता घडली. रचना लाईफस्टाईल येथील या आगीत वीस घरे जळून खाक झाल्याने कामगारांचे दैनंदिन जीवनोपयोगी साहित्य, दागिने, कागदपत्रे व रोख रक्कम जळून नुकसान झाले आहे.

सर्व कामगार कामावर गेलेले असल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.या घटनेत स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या लहानमोठ्या एकूण एकोणतीस सिलिंडर टाक्या जळाल्या त्यापैकी तीन टाक्यांचे स्फोट झाले होते.

एकूण सव्वीस सिलिंडरच्या टाक्या जळालेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आल्या.अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून पुर्णपणे हि आग आटोक्यात आणली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने तापमान वाढीमुळे जलदगतीने आग सर्वच घरांमध्ये पसरली व कपडे,

लाकडे यांनी पेट घेतला व ओळीने असलेल्या पत्र्यांची घरे जळून गेली.या ठिकाणी एकूण पन्नास पत्र्याचे शेड उभारून तेथे कामगारांना राहण्याची सोय करण्यात आली होती यापैकी वीस घरे या आगीत जळाली आहेत.

आग विझविण्यासाठी पाषाण अग्निशमन केंद्रासह पीएमआरडीए मारुंजी,हिंजवडी एमआयडीसी, औंध,कोथरूड व वारजे येथील अग्निशमन दलाच्या बंबांनी हि आग विझवली.सात फायरगाड्या, दोन वॉटर ब्राऊजर गाड्यांच्या सहाय्याने हि आग विझवण्यात आल्याची माहिती अग्निशमन अधिकारी शिवाजी मेमाणे यांनी दिली.

आग विझवण्यासाठी अग्निशमन अधिकारी शिवाजी मेमाण,कमलेश सनगाळे,गजानन पात्रुडकर फायरमन जवान,शशिकांत धनवटे,गजानन बालघरे, चंद्रकांत बुरुड,देविदास चौधरी,सोपान बहिरम,महेश चिरगुटे,स्वप्निल वाघमारे,रमेश रणदिवे, जोरी यांनी प्रयत्न केले.

सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक एका पत्र्याच्या शेडमधून धूर निघाला व थोड्या वेळाने लगेच गॅसच्या टाकीचे स्फोट झाले. त्यानंतर आग लागली व जवळपास वीस घरे आगीत जळून खाक झाली.या आगीच्या दुर्घटनेत आमच्या घरात ठेवलेले एक तोळा सोने व पस्तीस हजार रुपये जळून नुकसान झाले.

- विठ्ठल नाईक, कामगार

आगीच्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या वतीने तातडीने मदत पोहचविण्यात आली तसेच संबंधितांकडूनही जेसीबी लगेच उपलब्ध झाल्याने आग विझवण्यासह पत्रे हटवण्यास मदत झाली. यामुळे पन्नास पैकी तीस घरे आगीपासून वाचवण्यात यश आले.

- शिवाजी मेमाणे, अग्निशमन अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.