Woman Molestation : सुस गावात झाडे तोडण्यास मनाई करणाऱ्या महिलेचा विनयभंग करीत शिवीगाळ; दोघांवर गुन्हा दाखल

महिलेला अश्लील शिवीगाळ करून धमकी देत विनयभंग केल्याचा प्रकार सुस गावात घडला. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांत सनी दत्तात्रय चांदेरे दीपक कुमार या दोघां विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime
CrimeSakal
Updated on
Summary

महिलेला अश्लील शिवीगाळ करून धमकी देत विनयभंग केल्याचा प्रकार सुस गावात घडला. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांत सनी दत्तात्रय चांदेरे दीपक कुमार या दोघां विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडी - मोकळ्या जागेत लावलेल्या अशोका व इतर प्रजातींच्या झाडांची जेसीबीच्या साहाय्याने कत्तल करणाऱ्या दोघां इसमांना विरोध केल्याने महिलेला अश्लील शिवीगाळ करून धमकी देत विनयभंग केल्याचा प्रकार मंगळवारी (ता. १७) सकाळी दहाच्या सुमारास घडला. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांत दोघा विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिल्याने सनी दत्तात्रय चांदेरे (वय-३०) व जेसीबी ऑपरेटर दीपक कुमार (दोघेही राहणार सुसगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हिंजवडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुस गावातील सर्व्हे क्रमांक २१२, प्लॉट क्रमांक ३४ येथे फिर्यादी यांच्या वडीलांच्या पत्र्याच्या खोल्या आहेत. या खोल्यांच्या पाठिमागे मोकळ्या जागेवर अशोकाची, झाडे लावलेले आहेत.

मंगळवारी (ता. १७) सकाळी आरोपी चांदेरे हा एमएच. १२, ईसी. ११७० क्रमांकाचा जेसीबी घेऊन आला. जेसीबीच्या साहाय्याने तो झाडे तोडू लागला. तेंव्हा फिर्यादी यांनी तुम्ही झाडे काढू नका असे म्हणत त्यास विरोध केला. त्या जेसीबी समोर थांबल्या तेंव्हा चांदेरे याने ''तु पण तुझ्या बापासारखीच आहेस, तुझे काय करायचे आहे ते करतो'' असे म्हणुन अश्लील शिवीगाळ करत त्यांच्या छातीजवळ धरून ओढत विनयभंग केला. पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.