Sushma Andhare Protest : सुषमा अंधारेंनी मणिपूरी विद्यार्थ्यांसोबत केलं आंदोलन; दिल्या 'नरेंद्र मोदी गो बॅक'च्या घोषणा

Protest Against PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत
Sushma Andhare
Sushma AndhareEsakal
Updated on

PM Modi Visit Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवारी, 1 ऑगस्ट 2023) रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने पंतप्रधानांना सन्मानित करण्यात येत आहे. शरद पवार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमावरून चांगलंच राजकारण चांगलंच तापलं आहे. तर दुसरीकडे मणिपूर प्रकरणावरून मोदीच्या पुणे दौऱ्याला मोठा विरोध केला जात आहे.

त्यानंतर आज विविध संघटना आणि पक्षांनी हातात काळे झेंडे घेत, काळे कपडे घालत मोदींच्या दौऱ्याला विरोध केला आहे. तर यावेळी पुण्यातील मंडई परिसरात पुण्यात राहणाऱ्या मणिपूरी विद्यार्थ्यांनी हातात पोस्टर घेत आंदोलन केलं आहे. तर या आंदोलनात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील सहभागी झाल्या आहेत.

Sushma Andhare
Samruddhi Accident: पिलरजवळ काम करत होतो, अचानक क्रेन कोसळली! बचावलेल्या कामगाराने सांगितलं अपघात नेमका कसा झाला?

यावेळी जमलेल्या आंदोलकांनी हातात पोस्टर घेऊन 'नरेंद्र मोदी गो बॅक'च्या घोषणा दिल्या आहेत. मणिपूर जळत असतानाच एका खाजगी संस्थेचा पुरस्कार स्वीकारायला पंतप्रधानांनी पुण्याच यावं हे लज्जास्पद असल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे. यावेळी जमलेल्या आंदोलकांनी 'नरेंद्र मोदी गो बॅक'च्या घोषणा दिल्या आहेत. आंदोलनात मणिपूरी विद्यार्थ्यांनी देखील सहभाग नोंदवला आहे.

Sushma Andhare
Opposition Leader: अखेर काँग्रेसचा विरोधी पक्षनेता ठरला! या नेत्याच्या गळ्यात पडली विरोधी पक्षनेत्याची माळ

काँग्रेस, सामाजिक संघटनांकडून पुण्यात निषेध आंदोलन

काँग्रेससह इंडिया फ्रन्टच्यावतीनं युक्रांद, हमाल पंचायत आणि तर सामाजिक संघटनांनी महात्मा फुले मंडई परिसरात सकाळपासून पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला विरोधात करण्यात येत आहे. कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, रमेश बागवे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काळे फ्लेक्स परिधान करत आंदोलन केलं. यावेळी त्यांनी 'मोदी गो बॅक'च्या घोषणाही दिल्या. तसेच 'मन की बात मत करो, काम की बात करो' असे फलक दाखवण्यात आले होते.

Sushma Andhare
Samruddhi Accident: गर्डर अपघातातील मृतांना, जखमींना नुकसान भरपाई जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.